तरुण भारत

भाडेकरूंना आता ‘आधार’चा पत्ता बदलता येणार

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिली सुविधा

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

आता भाडेकरूंना घरासोबत आधारकार्ड चा पत्ता बदलणे शक्य आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) भाडेकरूंसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अनेक भाडेकरूंना दिलासा मिळाला आहे. आता आधार केंद्रावर फेऱया माराव्या लागणार नाहीत.

     भाडय़ाने घर घेत असाल आणि तुम्हाला त्याच पत्त्याचे आधार कार्ड हवे असेल, तर तुम्हाला भाडय़ाच्या कराराची आवश्यकता असेल, त्या भाडेकरारात आपले नाव लिहिलेले असले पाहिजे. अर्जाच्या वेळी भाडेकराराचे दस्तावेज स्कॅन करून त्याची पीडीएफ प्रत अपलोड करावी लागेल. आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची अर्ज करण्यासाठी तुम्हाला  UIDAI https://uidai.giv.in च्या अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल. येथे ऍड्रेस अपडेट रिक्केस्टवर क्लिक करावे लागेल. आपण हे करताच एक नवीन विंडो उघडेल. यानंतर आपण आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा आणि लॉगिन करा. येथे सर्व तपशील भरा आणि भाडे कराराची पीडीएफ प्रत अपलोड करा. असे केल्यावर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल. आपण हे प्रविष्ट करताच आपण पोर्टलवर सबमिट बटण दाबा आणि ही आपल्या विनंती विभागात पोहोचेल.      

Related Stories

सातारा : कडगुण येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू रिपोर्ट निगेटिव्ह

Shankar_P

शिवाजी विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभ मंगळवारी

triratna

अजिंक्य कॉलनी, रामकृष्ण कॉलनी, सह्याद्री कॉलनीला जिल्हा रुग्णालयाचा त्रास

Amit Kulkarni

सातारा : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ टेम्पोला आग

triratna

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,011 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

पंकजा मुंडे यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र; त्या म्हणाल्या…

pradnya p
error: Content is protected !!