तरुण भारत

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

वार्ताहर/ देवरुख

संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथे राकेश मनोहर सावंत या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. हत्येनंतर मृतदेह सुमारे 600 मीटर लांब ओढत नेऊन शिंदेवाडीनजीकच्या शेवरपऱयाच्या पाण्यात टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीन ते मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

Advertisements

  देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबतची फिर्याद प्रवीण तुकाराम सावंत (53) यांनी दिली. कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांनी या बाबत साखरपा पोलीस दूरक्षेत्राला माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. खुनाचे वृत्त कळताच गावात खळबळ उडाली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी प्रवीण यांचा पुतण्या राकेश (36) यांच्या डोक्यात दगड घालून अज्ञातांनी खून केला. त्यानंतर मृतदेह घराजवळून सुमारे 600 मीटर लांब ओढत नेऊन शेवरपऱयाच्या पाण्यात पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने टाकण्यात आला असावा, असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. राकेशचा खून कोणत्या करणातून आणि कोणी केला, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या या बाबत कोणतीच कारणे पुढे आलेली नाहीत.

   मंगळवारी सकाळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास साळोखे, देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक विद्या पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर, वैभव कांबळे, महिला कॉन्स्टेबल अर्पिता दुधाणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अज्ञात खुन्याविरोधात भारतीय दंडविधान कलम 302,201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी लवकरच गजाआड करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Related Stories

वीजबिल भरण्यासाठी तीन-चार टप्पे द्या

Patil_p

कांदळगावचे सुपुत्र हेमंत राणे यांना राष्ट्रपती पोलीस पदक

NIKHIL_N

‘वनविड, योजना’ची उत्पादनबंदी उठवली !

triratna

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर ओरोसलाच होणार अंत्यसंस्कार

NIKHIL_N

रत्नागिरी : पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न ; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

triratna

‘कोरे’ मार्गावर 2 पासून राजधानी एक्स्प्रेस धावणार

NIKHIL_N
error: Content is protected !!