तरुण भारत

रत्नागिरीत लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी, वृध्दांना चक्कर

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील मिस्त्री हायस्कूल सेंटरवर प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत 2 वृध्दांना चक्कर आली. मिस्त्राr हायस्कूलच्या गेटवर मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास 1500 हून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. दुसऱया लसीची ऑनलाईन नोंद होत नसल्याने नागरिकांनी रांगा लावल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाकडून याचे कोणतेच नियोजन न झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला व नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

Advertisements

  जिह्यात अनेक दिवसात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यातच आलेला नाही. अनेक नागरिकांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपत आली आहे. यामुळे हवालदिल झालेल्या अनेक नागरिकांनी दुसऱया डोससाठी पहाटेपासून मिस्त्राr हायस्कूलच्या मैदानात गर्दी करण्यास सुरूवात केली होती. सकाळच्या सत्रात कोविशिल्डचा पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी होतीच. कोव्हॅक्सिन दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे गर्दी आणखीनच वाढली. दुपारच्या सत्रात आपल्याला लवकर डोस मिळावा, या उद्देशाने अनेकजणांनी पहाटे 5 वाजल्यापासून हजेरी लावली होती.

 या गोंधळात काहीजणांची पोलिसांशी बाचाबाची झाली. दुपारी डोस घेणाऱया नागरिकांनी सकाळपासून गर्दी करू नये, त्यांनी दुपारनंतर केंद्रावर यावे, त्यामुळे सकाळी डोस घेणाऱया लोकांना सुरळीतपणे डोस घेता येईल, गर्दी होणार नाही, असे पोलीस वारंवार सांगत होते. मात्र कुणीही ऐकायला तयार नव्हते. शेवटी दुपारी दुसऱया डोससाठी आलेल्या लोकांना जबरदस्तीने आवाराबाहेर काढण्यात आले. त्यांना दुपारी 2 वा. येण्यास सांगण्यात आले. यामुळे दुपारी दीड वाजल्यापासून या केंद्रावर पुन्हा गर्दी वाढायला सुरूवात झाली. मात्र या सर्वांना गेटमधून आत प्रवेशच देण्यात न आल्याने गोंधळ आणखी वाढला.

  मोठय़ा संख्येने नागरिक आल्याने व जीजीपीएसपासून गोगटे कॉलेजच्या मुख्य गेटपर्यंत अनेकांनी दुचाकी, रिक्षा, कार पार्क केल्याने वाहतूक कोंडी झाली. अडीचच्या सुमारास मुख्य गेटमधून काहीजणांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. या गर्दीत अनेक वयोवृध्द होते. जो तो आत घुसण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि या गोंधळात 2 वृध्द चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. तरीही गोंधळ सुरूच होता. शेवटी पोलिसांनी गेटमधून आत घुसलेल्या लोकांना वेगळे केले आणि घुसणाऱयांना थोपवून धरले. यानंतर पोलिसांची आणखी कुमक दाखल झाली. अधिक संख्येने पोलीस दाखल झाल्यानंतर गर्दी नियंत्रणात आणतानाच गेटच्या आत घुसलेल्या लोकांची रांग लावली.

 नागरिक सकाळपासून रांगेत उभे होते व त्यांची उशिरापर्यंत रांगेत उभे राहण्याची तयारीही होती. मात्र तेथील पोलीस व अन्य कर्मचाऱयांनी नागरिकांना गेटबाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यामुळे पहाटेपासून उभे असलेल्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर दुपारी तीन वाजता या ठिकाणी आणखी गर्दी झाली. यामध्ये गोंधळ निर्माण झाला. मुळात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस जवळपास 40 दिवसानंतर उपलब्ध झाला होता. केवळ 200 डोस आल्याने पहिला डोस घेतलेले 1500 लोकांनी गर्दी केली. कोव्हॅक्सिनची पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी लस घ्यायची होती, मात्र 40 दिवस उलटून गेले तरी लस मिळत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होताना गर्दीत थोडी चेंगराचेंगरी झाली. याचे नियोजन प्रशासन पातळीवर योग्यरितीने होणे आवश्यक होते. ते न झाल्याने हा गोंधळात बऱयाच ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले.

Related Stories

शिक्षकांची कोरोना टेस्ट सुरू

Patil_p

मासळीची आवक वाढली, दरांमध्ये घसरण

Omkar B

पालकमंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N

आठ दिवस उलटूनही वादळग्रस्त मदतीपासून वंचितच!

NIKHIL_N

चौपदरीकरणातील मातीचा भराव वाहून शेतात!

Patil_p

रत्नागिरी : नगरपरिषद दवाखान्यास बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा ठराव समंत

Shankar_P
error: Content is protected !!