तरुण भारत

सदलग्यात दोन दिवसात कोवीड सेंटर सुरू करणार

वार्ताहर/ सदलगा

सध्या देशात सर्वत्र हाहाकार माजवलेल्या कोरोना महामारीच्या अशा स्थितीत रुग्णांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना सुविधा पुरविण्यासाठी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन, माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या वतीने सदलगा येथे 20 बेडचे कोवीड सेंटर येत्या 2 दिवसात सुरु होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांनी दिली.

Advertisements

 चिकोडी तालुक्मयातील सदलगा हे शहर दुसऱया क्रमांकाचे शहर असून येथील लोकसंख्या पन्नास हजाराच्या घरात आहे. सदलगा शहरासह ग्रामीण भागात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा अपुऱया ठरत आहेत. अशा स्थितीत अन्नपूर्णेश्वरी फाऊंडेशन वतीने सदलगा येथे 20 बेडचे कोवीड सेंटर येत्या 2 दिवसात सुरू होणार आहे. यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याचे माहिती गुंडकल्ले यांनी दिली. या सेंटरमध्ये डॉ. अक्षय कडकोळ, डॉ. अक्षय मरगट्टी, डॉ. विवेक मालदार यांची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  अंकली येथे दोन, चिकोडी येथे एक, एकसंबा येथे एक अशी चार कोवीड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. लवकरच सदलगा, खडकलाट, पट्टणकुडी येथेही अन्नपुर्णेश्वरी फाऊंडेशन, माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्यावतीने लवकरच कावीड सेंटर सुरु  करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पिरगौंडा पाटील, नगरसेवक सतिश पाटील, भिमराव माळगे, रवि गोसावी, मेहबूब काले, संतोष नवले, सुरेश कुंभार, समेरु पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Stories

लॉगर्स, गोकाक क्रिकेट क्लब संघ विजयी

Amit Kulkarni

सौंदत्ती तालुक्याला पावसाचा दणका

Patil_p

आजपासून दोन पॅसेंजर होणार बंद

Amit Kulkarni

मरकजमध्ये सामील, पण माहिती ठेवली लपवून!

Patil_p

अनगोळचा रस्ता कधी स्मार्ट होणार

Patil_p

‘ईडी’च्या नावे भल्याभल्यांसाठी रचले ‘सापळे’

Amit Kulkarni
error: Content is protected !!