तरुण भारत

महाराष्ट्रात मागील 24 तासात 71 हजार रुग्णांची कोरोनावर मात! पण ‘हा’ आकडा चिंताजनक

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात तब्बल 71,966 जणांनी कोरोनावर मात केली. तर 40,956 नव्या रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवशी 793 जणांनी आपला जीव गमावला असून मृत्यूंचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे ठरले आहे.

Advertisements


दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 51 लाख 79 हजार 929 वर पोहचली आहे. यातील 45 लाख 41 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 77 हजार 191 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.49 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 58 हजार 996 रुग्ण उपचार घेत आहेत. 

  • मुंबई : 6 हजार पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज! 


मुंबईतून देखील थोडी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात तब्बल 6,082 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 1,717 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आता पर्यंत 6,23,080 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 41,102 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Related Stories

कोरोनिल : बाबा रामदेव यांच्यासह चौघांविरोधात FIR

datta jadhav

…त्यांनी त्यांचा बाप दाखवावा : संजय राऊत

Rohan_P

भारतात येणार अमेरिकेचे विदेश अन् संरक्षण मंत्री

Omkar B

पंतप्रधान मोदींनी केले आशियातील सर्वात मोठ्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन

datta jadhav

पंतप्रधानांसह खासदारांच्या वेतनात तीस टक्के कपात

prashant_c

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!