तरुण भारत

देशात कोरोनाबळींचा नवा उच्चांक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

देशात प्रचंड वेगाने होत असलेला कोरोना संसर्ग आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे  अनेकांचे जीव जात आहेत. काहींना उपचाराअभावी तर काहींना उपचारादरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने प्राणाला मुकावे लागत आहे. मंगळवारी कोरोनाबळींच्या दैनंदिन संख्येने देशात उच्चांक गाठला.  

Advertisements

मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 421 नवीन संक्रमित रुग्ण आढळले. तर  4205 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

देशात आतापर्यंत 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 37 लाख 04 हजार 099 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत  2 लाख 54 हजार 197 रुग्णांचा बळी घेतला आहे.

मंगळवारी 23.8 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, आतापर्यंत देशातील 17.52 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

Related Stories

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्रावरच देशाची वाटचाल

Patil_p

कोरोना मृत्यूदरात घट, स्वास्थ्यदरात वाढ

Patil_p

लॉकडाऊन संपल्यानंतर बांधणार मोदींचे मंदिर…

datta jadhav

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर

Patil_p

बद्रीनाथ धाममध्ये मिनी स्मार्ट सिटीची निर्मिती

Patil_p

वैमानिक बाधित, विमान परत बोलाविले

Patil_p
error: Content is protected !!