तरुण भारत

संजय राऊत कार्टुन शेअर करत म्हणतात पत्रकार ‘फ्रन्ट लाईन वर्करच’

मुंबई \ ऑनलाईन टीम

महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा, अशा आशयाचे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच, महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. आता, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही एक कार्टुन शेअर करत, पत्रकार हे फ्रन्टलाईन वर्करच असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मेन्शन करत पत्रकारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी कार्टुनिस्ट सतिश आचार्य याचं कार्टुन शेअर केलं आहे. या कार्टुनमध्ये आत्तापर्यंत 235 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. तसेच, मी ही बातमी पूर्ण करूच शकत नाही, कारण बातमी लिहून पूर्ण होईपर्यंत मृत्यूचा आकडा बदललेला असतो, असा टोलाही या चित्रातून लगावण्यात आला आहे.


कोरोना काळात महाराष्ट्रातील पत्रकार समाज जागृतीचे काम करत आहेत. सातत्याने सरकार करत असलेले प्रयत्नदेखील ते समोर आणत आहेत. ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्यावर अंकुश ठेवण्याचे कामही ते करत आहेत. त्यासाठी त्यांना बाहेर फिरावे लागते. अनेक ठिकाणी जावे लागते. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आपण फिरण्याची मुभा दिली आहे; मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे सर्वच पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी गृहमंत्र्यांनी आपल्या पत्रात केली आहे. तसेच त्यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

परवानाधारक व्यावसायिकांचे पुढील सहा महिन्यांचे शुल्क माफ करा

datta jadhav

आदित्य ठाकरेंचा वाढदिवशी स्तुत्य उपक्रम

Rohan_P

उचगांव येथील ५२ वर्षीय कोरोना बाधित शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

पादुकांची एसटीतून ‘पंढरीची वारी’

Patil_p

सांगली : पाच जणांचा मृत्यू, 168 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

पुढील 4 तासात मुंबई, कोकणात जोरदार पावसाचा इशारा

Rohan_P
error: Content is protected !!