तरुण भारत

को – 265 जातीच्या ऊसाची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाही

साखर आयुक्तालयाचा कारखान्यांना दणका, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ

संग्राम कदम / आळसंद

Advertisements

को – 265 जातीच्या उसाची नोंद घेण्यास नकार देणाऱ्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने दणका दिला असून ऊस नोंद न केल्यास गाळप परवाना नाकारण्याचा इशारा दिला आहे. याबाबत साखर सहांचालक विकास पांडुरंग शेळके यांनी मंगळवार दिनांक ११ मे रोजी राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी कारखान्यांना नोटीस काढली आहे.

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ऊस शेतकऱ्यांच्या को- 265 या जातीच्या ऊसाच्या नोंदी काही सहकारी व खाजगी साखर कारखाने घेत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने को- 265 या जातीच्या ऊसाच्या नोंदी घेणेबाबत व गाळप करणेबाबत यापूर्वी दि. 16 नोव्हेंबर 2018 रोजी सर्व साखर कारखान्यांना सूचना दिलेल्या होत्या. तरीही काही कारखाने शेतकऱ्यांच्या को- 265 या जातीच्या ऊसाच्या नोंदी घेणे नाकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. साखर कारखान्यांची ही कृती शासन धोरणा विरुद्ध असल्याचे स्पष्ट होते.

मध्यवर्ती ऊस संशाधन केंद्र पाडेगाव येथे विकसीत केलेल्या को- 265 या ऊस जातीच्या लागवडीस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. को- 265 या ऊस जातीच्या लागवडीस शासनाची परवानगी असून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI ) ने ऊस वाण लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित केलेले आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांना पुन्हा सूचना देणेत येते की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या को-265 या ऊस जातीची नोंदी घेण्यात यावी. ज्या साखर कारखान्यांमार्फत को-265 जातीच्या ऊस लागवडीची नोंदी घेतली जाणार नाही त्या साखर कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल. शेतक-यांच्या अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा प्राप्त होणार नाही यांची दक्षता संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाने घ्यावी.

सांगली जिल्ह्याचा सर्वाधिक फायदा

साखर सहसंचालक शेळके यांच्या या आदेशाचा फायदा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर 265 वाणाची लागवड करण्यात आली असून उतारा कमी येतो आणि वजन जादा भरते या सबबीखाली कारखाने लागवड करूच नये म्हणून दबाव आणत होते. तरीही शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर आता नोंद करणे नाकारले जात आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर शासनाकडे धाव घेतली होती. या आदेशाने त्यांना दिलासा मिळाला आहे

….तर गाळप परवाना नाही

ज्या साखर कारखान्यांमार्फत को-265 जातीच्या ऊस लागवडीची नोंदी घेतली जाणार नाही त्या साखर कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा प्राप्त होणार नाही यांची दक्षता संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाने घ्यावी.

पांडुरंग शेळके सहसंचालक साखर (विकास)

Related Stories

सातारा जिल्हय़ात कोरोनाचा वाढता कहर : 496 बाधित, 240 मुक्त

triratna

कुपवाडकरांना २२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळणार स्वतंत्र शववाहिका

Shankar_P

साताऱ्यात दोन दिवस पाणी कपात

datta jadhav

दारु पिण्यास पैसे न दिल्याने युवकाला दगडाने मारहाण

Amit Kulkarni

धनंजय महाडिक, महेश जाधव भाजपचे `सारथी’ !

Shankar_P

अत्यवस्थ कोरोना रुग्णाचा मृत्यू टाळण्यासाठी शेवटपर्यंत लढूया: मंत्री हसन मुश्रीफ

Shankar_P
error: Content is protected !!