तरुण भारत

बेंगळूर : म्युकर मायकोसिसच्या घटनांमध्ये वाढ

बेंगळूर/प्रतिनिधी

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड कहर निर्माण केलेला असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे लागत आहेत. देशात दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरातनंतर कर्नाटकमध्ये कोविड -१९ मधील रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस किंवा ‘ब्लॅक फंगस’ चा संसर्ग झाल्याची माहिती दिली जात आहे.

शहरातील बेंगळूर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (बीएमसीआरआय) अलीकडे संक्रमित झालेल्या आठ नमुन्यांचा शोध घेत आहे ज्यांना काळ्या बुरशीची लक्षणे दिसून आली होती.

काही राज्यांतील कोविड -१९ रूग्णांमध्ये एक दुर्मीळ पण गंभीर बुरशीजन्य संसर्ग, म्युकर मायकोसिस किंवा ‘ब्लॅक फंगस’ तुलनेने वारंवार आढळतो. हा रोग बर्‍याचदा त्वचेमध्ये प्रकट होतो आणि फुफ्फुस आणि मेंदूवरही परिणाम करतो.

मेंदूपर्यंत इन्फेक्शन
म्युकर मायकोसिस हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. नाक आणि डोळ्याला हे इन्फेक्शन होतं. आणि डोळे आणि नाकाच्या मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचतं. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास या आजाराने मृत्यू ओढवतो. एवढं हे इन्फेक्शन्स धोकादायक असतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी या आजाराबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांची दृष्टीच हिरावून गेतली आहे.

डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काही रुग्णांना डोळ्यांची समस्या निर्माण होते किंवा त्यांचं डोकंदुखू लागतं. त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. या त्रासामुळे म्युकोर मायकोसिस फंगलचं इन्फेक्शन होऊ शकतं. सायनसमध्ये आधी त्रास होतो. नंतर दोन ते चार दिवसात हे इन्फेक्शन डोळ्यापर्यंत जातं. त्यानंतर 24 तासात मेंदूपर्यंत जातं. अशा परिस्थितीत रुग्णाचे डोळे काढण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. तसे न केल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisements

Related Stories

काही सदस्यांना अधिवेशनात सहभागी होण्यावर निर्बंध

Amit Kulkarni

कर्नाटकमध्ये १९ सप्टेंबर रोजी मेगा ई-लोक अदालत

Shankar_P

कर्नाटक: अमित शाह यांच्या दौर्‍यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

Shankar_P

सध्या लॉकडाऊनचा विचार नाही : मुख्यमंत्री

Shankar_P

सेवा सिंधू’वर आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ

Amit Kulkarni

सीडी प्रकरणातील दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Amit Kulkarni
error: Content is protected !!