तरुण भारत

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवारी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे.

Advertisements

  
ते आपल्या पत्रात म्हणाले की, कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 


पुुढे ते म्हणाले की, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. या संदर्भातील निर्णय तत्काळ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे, असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

Related Stories

राज्यात लवकरच पोलीस भरती : अनिल देशमुख

prashant_c

जिल्हा हादरला : एकाच दिवसात ५८ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

तासगाव तालुक्यात एका गावात एक रूग्ण

Abhijeet Shinde

नवरात्रौत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर

Rohan_P

फिर्यादीच निघाली आरोपी

Patil_p

महाराष्ट्रात एकाच दिवशी ३५० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

datta jadhav
error: Content is protected !!