तरुण भारत

International Nurses Day का साजरा केला जातो माहिती आहे का ?

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

सध्या जग कोरोना माहामारीचा सामाना करत आहे. या माहामारीत आपल्या जीवाची कसलीही पर्वा न करता डॉक्टर, नर्स रुग्णांची सेवा करत आहेत. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. खरं तर या माहामारीत डॉक्टर असतील किंवा नर्स असतील हेच आपल्यासाठी देव आहेत, असे म्हटले तरी वावगे वाटायला नको. कारण त्यांच्या अहोरात्र झटण्यामुळे आपण सुरक्षित आहे हेही तितकेच खरे आहे. खरं तर आपला श्वास ज्यांच्यामुळे आहे त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. आज (12 मे) जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day 2021) आहे. जगभरात आज हा दिन उत्साहात साजरा केला जातो. हा दिन का साजरा केला जातो, याचे महत्त्व काय तसेच याची सुरूवात कधी झाली व यंदाची थीम काय याबद्दलच आपण जाणून घेणार आहे.

जागतिक परिचारिका दिन का साजरा केला जातो ?

रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

1965 मध्ये झाली सुरूवात

1965 मध्ये हा दिन प्रथम साजरा करण्यात आला. मे 1974 मध्ये 12 मे हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. आधुनिक नर्सिंगचा संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म त्याच दिवशी 12 मे रोजी झाला आहे. त्यांचा जन्मदिन आंतरराष्ट्रीय नर्स डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणून 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं.

ज्यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्याविषयी थोडेसे…

इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात 12 मे 1820 रोजी फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण इंग्लंडमध्ये झालं. त्यांना वयाच्या 16 वर्षी जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झाला आहे. फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं मात्र त्यांच्या वडिलांचा याला विरोध होता. फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि 1851 मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं. 1854 साली क्रीमियाचं युद्ध झालं. तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत होतं. युद्धात सैनिक जखमी झाल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन तिथे दाखल झाल्या. त्यावेळी परिस्थिती अतिशय वाईट होती. याकाळात त्यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले. यामुळे सैनिकांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. युद्धकाळात रात्रीच्या वेळी हातात लालटेन म्हणजे कंदील घेऊन त्या रुग्णांची चौकशी करत होत्या. यामुळे सैनिक त्यांना प्रेमाने ‘लेडी विद लॅम्प’ म्हणत असत. 13 ऑगस्ट, 1919 रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचं निधन झालं. फ्लोरेन्स नायटिंगेल यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

जागतिक परिचारिका दिन 2021 थीम

जागतिक परिचारिका दिनाची प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम असते. सध्या संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत आहे. म्हणूनच जागतिक परिचारिका दिन 2021 ची थीम नर्स आहेत. ‘व्हॉईस टू लीड – व्हिजन फॉर फ्यूचर हेल्थकेअर … ‘ही यंदाच्या परिचारिका दिनाची टॅग लाईन आहे. या थीमच्या माध्यमातून लोकांमध्ये परिचारिकांचा आदर वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा अर्थ असा की भविष्यातील आरोग्य सेवेसाठी परिचारिका नेतृत्व, त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे.

जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व

कोरोना लढाईत परिचारिका खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. परिचारिका एक आई, बहीण म्हणून रुग्णांची सेवा करत आहेत. ही सगळी नाती जपत ती आपली जबाबदारी नेटाने पार पाडत आहे म्हणूनच तिला सगळे प्रेमाने ‘सिस्टर’ असे म्हणतात हेही तितकेच खरे आहे. नर्स स्व:ताचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करते. ती घर, कुटुंबापासून दूर राहून संपूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने रात्रंदिवस आपली कर्तव्ये पार पाडत असते. या पेशाशी संबंधित असलेल्या आनंदांबरोबर परिचारिकांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

कोरोनाच्या या लढाईत आपली ढाल बनून आपला बचाव करणाऱ्या या ‘सिस्टर’साठी एक थँक्यू तो बनता है बॉस….!

Advertisements

Related Stories

संभाजीराजे आजपासून नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

triratna

दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी ; चचेगाव येथील घटना

Patil_p

वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योध्यांचा सत्कार

pradnya p

चंदूर येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच; आज ५७ रुग्णांची भर तर दोघांचा मृत्यू

triratna

शरद पवार पुन्हा रुग्णालयात; उद्या होणार शस्त्रक्रिया

triratna
error: Content is protected !!