तरुण भारत

‘जॉन्सन ॲन्ड जॉन्सन’च्या लसीचे भारतात उत्पादन?

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :   

अमेरिकेतील ‘जॉन्सन ॲन्ड जॉन्सन’ या फार्मा कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे भारतात उत्पादन करण्याचे अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. भारतातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांशी यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे अमेरिकेचे गृहसचिव डॅनियल स्मिथ यांनी सांगितले.  

Advertisements

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यताही काही तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, भारतात लसींचा तुडवडा निर्माण होत असल्याने लस उपलब्ध करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या आपत्कालीन वापरालाही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. आता अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन भारतातील लस उत्पादनात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. जॉन्सन ऍन्ड जॉन्सन लसीच्या उत्पादनासाठी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.  भारतातील खासगी क्षेत्रामधील कंपन्यांशी तशी बोलणी सुरू आहेत.  

भारतात या लसीचे उत्पादन सुरू झाल्यास लसीचे उत्पादन अधिकाधिक वेगाने करता येईल. 2022 च्या अखेररीस भारतात 100 कोटी लसींचे डोस उपलब्ध होतील, असेही स्मिथ यांनी सांगितले.

Related Stories

बायडेनचा पहिला वार सौदी अरेबियावर

Amit Kulkarni

लॉकडाउन संपताच जल्लोष

Patil_p

कोलंबिया : सीमा बंदच

Patil_p

अफगाणिस्तानात 6 महिन्यात कोसळणार सरकार!

Patil_p

ट्रम्प यांचे घूमजाव…

datta jadhav

तेल टँकरच्या स्फोटात 91 जणांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!