तरुण भारत

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना

सातारा : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यू पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तकासाठी उपलब्ध आहेत, असे संदेश फेसबुकवर व व्हॉटसॲप वर फिरत आहेत. परंतु, हे मेसेज चुकीचे आहेत आणि अशा प्रकारे बालके दत्तकास दिली गेली तर ते बेकायदेशीर आहे. या विषयाचे गांर्भीय लक्षात घेऊन महिला व बाल विकास आयुक्तालय आणि Save the Children (India) या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एस. ढवळे यांनी दिली आहे.

या मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 1098 व मो.क्र. 8308992222, 7400015518 असा आहे. कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही ढवळे यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

धामणी येथील बबन खाड़े यांच्या शेतात 285 गांजाची झाड़े जप्त

Amit Kulkarni

सातारा : औंधचा सुपुत्र डॉ. आशिष पवारची सहाय्यक शास्त्रज्ञपदी निवड

Abhijeet Shinde

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ,पाच जण जखमी

Patil_p

सातारा : पथ विक्रेत्यांना केंद्राची योजना; पालिकेचे सहकार्य पण बँकांची आडकाठी

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३.२५ मि.मी.पावसाची नोंद

Abhijeet Shinde

सातारा : डोंगर माथ्यावरील साद्याभोळ्या जनतेला राजकीय अश्वासने देऊन भुलवण्याचा प्रकार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!