तरुण भारत

कर्नाटक सरकारने तज्ज्ञांकडून ‘ब्लॅक फंगस’ विषयी मागितला तपशील

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने बुधवारी आरोग्य तज्ज्ञांकडून म्युकर मायकोसिसच्या किंवा ‘ब्लॅक फंगस’ विषयी कोविड रुग्णांमध्ये सापडत आल्याने याबाबदल माहिती मागितली आहे. दरम्यान, राज्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण सापडत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने याविषयी तपशील मागविला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर म्हणाले, “काळ्या बुरशीचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करण्यासाठी मी तांत्रिक सल्लागार समिती आणि डॉक्टरांशी चर्चा केली आहे. कोविड रुग्णांना त्याची लागण होत असल्याने त्यांची काळजी त्याआधारे आम्ही कॉल करू.” कर्नाटकसह काही राज्यांत कोविड -१९ रूग्णांमध्ये काळ्या बुरशीचा एक दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग वाढत आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांना हैराण करून सोडलेलं असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे लागत आहेत. देशात दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरातनंतर कर्नाटकमध्ये कोविड -१९ मधील रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस किंवा ‘ब्लॅक फंगस’ चा संसर्ग झाल्याची माहिती दिली जात आहे.

Advertisements

Related Stories

15 दिवसातून एकदा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा

Amit Kulkarni

बारावी परीक्षा घेणे अनिवार्यच

Amit Kulkarni

अमली पदार्थ प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हे

Patil_p

हुबळी रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार

Shankar_P

“कर्नाटकात अ‍ॅम्फोटेरिसिन-बी औषधाची कमतरता”

Shankar_P

कर्नाटकात पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Shankar_P
error: Content is protected !!