तरुण भारत

पेट्रोल ‘शंभरी’वर डिझेल ‘नव्वदी’पार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बुधवारी प्रतिलिटर 25 पैशांनी वाढ झाली. चालू आठवडय़ातील ही तिसरी दरवाढ असून आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये पेट्रोल दराने ‘शंभरी’ पार केली असून डिझेल दर ‘नव्वद’च्या पुढे गेले आहेत. महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 90.68 रुपये प्रतिलिटर झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 92.02 रुपये तर डिझेल 82.61 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जात होते. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 98.36 आणि 89.75 रुपये प्रतिलिटर असे झाले आहेत.

Advertisements

देशभरात मागील आठवडय़ाभरापासून सुरु असलेली इंधन दरवाढ अद्यापही सुरु असून मागील आठ दिवसात पेट्रोल 1 रुपया 66 पैसे, तर डिझेल 1 रुपये 88 पैशाने महागले आहे. या दरवाढीमुळे महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोलने शंभरी पार केली आहे, तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. नांदेड जिल्हय़ात बुधवारी पेट्रोलचे दर 100 रुपये 54 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 49 पैसे झाले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देशभरात इंधन दरवाढ सुरु झाली आहे. मागील 8 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ बुधवारीही कायम राहिली. देशात विविध राज्यांमध्ये स्थानिक करांच्या दरानुसार पेट्रोल-डिझेलला वेगवेगळी किंमत आकारली जात आहे.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू असतानाच आता इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. सततच्या वाढीमुळे सामान्यांचे लॉकडाऊनमधील बजेट मात्र कोलमडले आहे. तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. इंधन दरवाढीबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ होत असल्यामुळे सर्वांनाच आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.

Related Stories

अभिनेता सिद्धार्थचे साहसी पाऊल

Patil_p

पाकिस्तानात शीखांवर त्याचार, भारताकडून निषेध

Patil_p

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

Rohan_P

देशात कोरोना रुग्णांची संख्या मंदावली

Patil_p

उत्तराखंडात मुसळधार पाऊस; अलकनंदा – मंदाकिनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

Rohan_P

दिल्लीतील दरियागंज मार्केटमध्ये नागरिकांची अलोट गर्दी

Rohan_P
error: Content is protected !!