तरुण भारत

पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात केरळच्या महिलेचा मृत्यू

इस्रायलचाही प्रतिहल्ला, 43 पॅलेस्टईनी ठार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

गेल्या एका आठवडय़ापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन असा संघर्ष भडकला असून पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात केरळमधील एक भारतीय महिला ठार झाली आहे. ती इस्रायलमध्ये परिचारिका म्हणून काम करीत होती. 31 वर्षांच्या या महिलेचे नाव सौम्या असे असून ती ऍश्केलॉन शहरात वास्तव्यास होती. ती व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या केरळमधील पतीशी बोलत असतानाच तिच्यावर क्षेपणास्त्र आदळले, अशी माहिती देण्यात आली.

मंगळवारी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर 1 हजारांहून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, इस्रायलने ‘लोहकवच’ (आयर्न डोम) तंत्रज्ञान विकसीत केलेले असल्याने यापैकी बव्हंशी क्षेपणास्त्रे निकामी ठरली. तथापि, काही क्षेपणास्त्रे मात्र काही भागांमध्ये आदळून काही प्रमाणात हानी झाली. अशाच क्षेपणास्त्राने सौम्याचा बळी घेतला, असे इस्रायलने स्पष्ट केले.

इस्रायलचा प्रतिहल्ला

बुधवारी सकाळी इस्रायलने गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईनच्या काही भागांवर जोरदार वायुहल्ले केले. त्यात 43 पॅलेस्टाईनी नागरीक ठार झाले. हमासच्या अनेक केंद्रांवर इस्रायलच्या विमानांनी अचूक हल्ले केले. दोन्ही प्रदेशांमधील संघर्ष भडकल्याने त्याचे रुपांतर पूर्ण युद्धात होऊ शकते, अशी चिंता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. हा संघर्ष जेरूसलेमच्या अधिग्रहणावरून उसळला आहे.

जेरूसलेममधील मशीद कारण

जेरूसलेम येथील अल् अक्सा मशिदीवर पॅलेस्टाईनांनी दावा सांगितला आहे. मात्र इस्रायलचे या मशिदीच्या परिसरासकट संपूर्ण जेरूसलेमवर नियंत्रण आहे. या भागात ज्यू लोकांची संख्या वाढविण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. ज्यू लोकांना येथे वसविण्याचा आपला अधिकार आहे, असे या देशाचे म्हणणे आहे. त्यामुळे नेहमी पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात संघर्ष होत असतो. सध्या या संघर्षाने उग्र स्वरूप धारण केले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांततेसाठी संवाद व्हावा यासाठी विश्व समुदायाचे प्रयत्न चालले आहेत. मात्र, हमासला कायमचा धडा शिकविल्याखेरीज शांतता चर्चा न करण्याचा निर्धार इस्रायल व्यक्त करत आहे. त्यामुळे हमासची शक्ती नष्ट करण्याचा या देशाचा प्रयत्न आहे.

Related Stories

अफगाणमध्ये स्फोटात 30 दहशतवाद्यांचा मृत्यू

Patil_p

उध्वस्त ‘गाझा’च्या मदतीसाठी इजिप्त सरसावला

datta jadhav

ऑस्ट्रियात पुढील वर्षी लस न घेतलेल्यांवर भरभक्कम दंड

Patil_p

पेरूमध्ये बाधितांची संख्या 12.83 लाखांवर

datta jadhav

अफगाणिस्तानात तालिबानी नेत्याची हत्या

datta jadhav

ब्राझीलमध्ये 2.22 लाख कोरोनाबळी

datta jadhav
error: Content is protected !!