तरुण भारत

रत्नागिरीत यंत्रणा अलर्ट!

पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळसदृश स्थितीची शक्यता

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पूर्वेकडील अरबी समुद्रात 16 मेच्या सुमारास चक्रवाती वादळाची निर्मिती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार, पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होत आहे. 16 मे रोजी महाराष्ट्र, गोवा किनाऱयावर 40-45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यासाठी रत्नागिरीतील यंत्रणा अलर्ट केल्या गेल्या आहेत.

  14 ते 16 मे या कालावधीत लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्रकिनाऱयावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेकडील अरबी समुद्रावर 14 मे च्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याबावत व सध्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना किनाऱयावर परत येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विभागांतर्गत सर्व मच्छीमार व समुद्रकिनाऱयावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱयांना 15 व 16 मे या कालावधीत आपापल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

खारेपाटण जवळील नडगीवे घाटात दरड कोसळली

Ganeshprasad Gogate

लोरे, नाडण येथे दोघे बुडाले

NIKHIL_N

भातगावात वाळूचा संक्शन पंपाव्दारे उपसा

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आणखी २६ कोरोना पाॅझिटीव्ह

triratna

मंगलोर स्पेशल एक्सप्रेसचा अपघात टळला

Patil_p

नीट परीक्षेला जाणे होणार सोपे

NIKHIL_N
error: Content is protected !!