तरुण भारत

पाकच्या पंतप्रधानांची फजिती

सौदी अरेबियातून तांदळाच्या पोती घेऊन परतले इम्रान

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

Advertisements

तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मायदेशी परतले आहेत. सौदी अरेबिया सरकारने पाकिस्तानला 19032 तांदळाच्या पोत्या दान केल्या आहेत. पाकिस्तानातील विरोधी पक्ष याला देशाचा अपमान ठरवत आहे. इम्रान जितक्या किमतीचा तांदूळ सौदी अरेबियातून घेऊन आले आहेत, त्याहून अधिक पैसे त्यांनी दौऱयावर खर्च केल्याचा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी केला आहे.

इम्रान या दौऱयात 12 मंत्री आणि मित्रांनाही सोबत घेऊन गेले होते. पण इम्रान सरकार या दौऱयाला स्वतःची मोठी कामगिरी ठरवत आहे. इम्रान खान यांनी राजकारणात 22 वर्षे हा दिवस पाहण्यासाठीच मेहनत केली होती. अण्वस्त्रसज्ज देशासाठी अशाप्रकारची मदत स्वीकारण्यापूर्वी त्यांनी विचार करायला हवा होता, असे भुट्टो यांनी म्हटले आहे.

मंत्र्यांकडून बचाव

विरोधकांच्या टीकेनंतर इम्रान सरकारचे मंत्री आणि अधिकारी बचावाच्या भूमिकेत शिरले आहेत. पाकिस्तानने गरीबांसाठी सौदीकडून अशाप्रकारची मदत यापूर्वीही स्वीकारली आहे. तांदळाच्या पोती दान करण्याचा निर्णय सौदीने एक महिन्यापूर्वीच घेतला होता. इम्रान आणि सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यात द्विपक्षीय संबंध सुधारण्यावरून चर्चा झाल्याचा दावा इम्रान यांचे विशेष सल्लागार ताहिर अशरफी यांनी केला आहे.

चिनी लस घेतलेल्यांना प्रवेश नाही

इम्रान हे रविवारी परतले होते. चिनी लस घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकांना कुठल्याही प्रकारचा व्हिसा देणार नसल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे. सौदी अरेबियाच्या नियामकाने चीनच्या सायनोवॅक आणि सायनोफार्म लसीला मंजुरी दिलेली नाही.

Related Stories

चिनी अध्यक्षांचा ‘युद्धाच्या तयारी’चा आदेश

Patil_p

स्पेन : लसीकरण दृष्टीपथात

Patil_p

ट्रम्प महाभियोगाला सिनेटची अनुमती

Patil_p

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करून 17 वर्षीय मुलाने कमावले 1 लाख डॉलर

datta jadhav

रूग्णांची प्रतिदिन संख्या पुन्हा 3 लाखांवर

Patil_p

जगातील सर्वाधिक घातक पाणबुडी कोणत्या देशाकडे आहे?

Patil_p
error: Content is protected !!