तरुण भारत

रेस वॉकर केटी इरफानसह पाच ऍथलेट्स ‘पॉझिटिव्ह’

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला रेस वॉकर केटी इरफानसह ट्रक ऍन्ड फील्डमधील  एकूण पाच ऍथलेट्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते सध्या बेंगळूरमधील साई पेंद्रात ट्रेनिंग घेत आहेत.

Advertisements

गेल्या शुक्रवारी त्यांची चाचणी घेण्यात आली होती आणि जे पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ‘गेल्या शुक्रवारी घेतलेल्या चाचणीत किमान पाच प्रमुख ऍथलेट्स पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना इतरांपासून अलग ठेवण्यात आले आहे,’ असे साई केंद्रातील एका सूत्राने सांगितले. आणखी एक रेस वॉकर पॉझिटिव्ह असू शकतो. मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही, असेही या सूत्राने सांगितले. ‘चार पुरुष आणि एक महिला खेळाडू तसेच साहायक स्टाफमधील चारजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील महिला खेळाडू आपल्या घरातून आली होती. या सर्व खेळाडूंची 6 रोजी चाचणी घेण्यात आली होती आणि 7 रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला होता. त्यांना 29 एप्रिल रोजी लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. मात्र त्यातील एक महिला व एक पुरुष खेळाडूचे लसीकरण झालेले नव्हते. त्यांची 10 मे रोजी पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल शुक्रवारी मिळणार आहे,’ असेही या सूत्राने स्पष्ट केले. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या खेळाडूंत एकही महिला रेस वॉकर नसल्याचे समजते. येथे ट्रेनिंग घेत असलेले पाच ऍथलेट्स गेल्या महिन्यात पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात प्रियांका गोस्वामी, जिन्सन जॉन्सन, पारुल चौधरी, चिंता यादव, रेस वॉकर एकनाथ यांचा समावेश होता. रशियाचे रेस वॉक प्रशिक्षक अलेक्झांडर अर्तसिबाशेव्हही त्यावेळी पॉझिटिव्ह आढळले होते. केटी इरफानचा जॉन्सनशी त्यावेळी संपर्क आला होता. तरीही त्यावेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

Related Stories

आशिया चषक महिला फुटबॉल पात्रता स्पर्धेचा ड्रॉ लांबणीवर

Patil_p

राजस्थानच्या विजयात स्टोक्सचे झंझावाती शतक

Patil_p

चौथ्या दिवशी भारताला तीन सुवर्णपदके

Patil_p

कोहलीचे अग्रस्थान कायम, रहाणे आठव्या स्थानी

Patil_p

पीसीबीकडून हाफीजला मध्यवर्ती करारची ऑफर

Patil_p

कोरोना लढा : भारतीय ऑलिम्पिक महासंघाचाही पुढाकार

Patil_p
error: Content is protected !!