तरुण भारत

रिषभ पंतला पहिला डोस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघातील स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने कोव्हिड-19 व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला. 23 वर्षीय रिषभचा न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल व इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे. पहिला डोस घेतल्यानंतर रिषभने ट्वीटर हँडलवर त्याचे छायाचित्र पोस्ट केले आणि शक्य तितक्या लवकर लसीकरण करवून घेण्याचे आवाहन केले.

Advertisements

ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध मालिकाविजयात सिंहाचा वाटा उचलणारा रिषभ पंत सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम बहरात असून अलीकडेच स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेत तो दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व भूषवत होता. पंतचे संघसहकारी कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह यांनी देशातील विविध केंद्रांवर यापूर्वी आपला पहिला डोस घेतला आहे. सर्व वरिष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्चमध्ये सर्वप्रथम पहिला डोस घेतला. सध्या 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती लस घेण्यास पात्र आहे.

Related Stories

राजस्थान रॉयल्सच्या फिरकी सल्लागारपदी ईश सोधी

Patil_p

प्रिमियर लीगमधील चार फुटबॉलपटू कोरोना बाधित

Patil_p

सन्नाटा आणि दिलासा…

Patil_p

चोप्राचे प्रशिक्षक बार्टोनीझ यांच्या करारात वाढ

Patil_p

अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा 19 नोव्हेंबरपासून

Patil_p

महिला हॉकी संघाचे स्वप्नभंग; कांस्यपदक लढतीत ग्रेट ब्रिटनकडून पराभव

Rohan_P
error: Content is protected !!