तरुण भारत

रॉयल एनफिल्डने उत्पादन थांबविले

नवी दिल्ली : आरामदायी दुचाकी क्षेत्रातील कंपनी रॉयल एनफिल्डने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कारखान्यातील उत्पादन थांबविले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेने जवळपास सर्वच उद्योगांवर परिणाम दाखविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ऑटो क्षेत्राचाही आता समावेश झाला आहे. ऑटो क्षेत्रातील रॉयल एनफिल्डनेही दुचाकी निर्मितीचे काम 16 मेपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याला वाहन विक्रीत ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नसल्याची नोंद कंपनीने केली आहे. चेन्नईमधील कंपनीच्या कारखान्याचे काम सध्या बंद ठेवण्यात आले आहे. येथे हिमालयन, क्लासिक आणि बुलेट या गाडय़ांची निर्मिती होत होती.

Related Stories

मारुती सुझुकीची नवी सुधारीत स्विफ्ट लाँच

Patil_p

मारूती सुझुकीची नवी सेलेरियो दाखल

Patil_p

बाऊन्स इनफिनिटीची इलेक्ट्रिक स्कूटर डिसेंबरमध्ये येणार

Patil_p

टाटा सफारी 26 जानेवारीला बाजारात

Patil_p

मर्सिडिझच्या नव्या वर्षात 15 कार्स येणार

Patil_p

मारूती सुझुकीकडून 20 लाख कार्सची निर्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!