तरुण भारत

आता सॉव्हरीन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणुकीची संधी

पहिली विक्री 17 ते 22 मे पर्यंत करता येणार : रोख रकमेत गुंतवणूक करता येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

सध्या कोरोनाच्या काळजीमुळे व अन्य आर्थिक संकटजन्य स्थिती निर्माण होत असल्यामुळे सरकारकडून विविध योजना आखल्या जात आहेत. यामध्ये सध्या पुन्हा एकदा सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड गुंतवणुकीसाठी संधी मिळणार आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरीन गोल्ड बॉण्डची पहिली विक्री 17 मे पासून सुरु होणार आहे. ती पुढे 21 मे पर्यंत चालणार असल्याची माहिती आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरीन गोल्ड बॉडमध्ये गुंतवणूक ही मे ते सप्टेंबर या कालावधीत सहा टप्प्यात करता येणार असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार बॉण्डच्या या योजनेमध्ये बँकांच्या आधारे गुंतवणूक करता येणार पण ती रोख रकमेत करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे सॉवरेन गोल्ड बॉण्ड?

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड एक सरकारी बॉण्ड असतो. यामध्ये डीमॅटच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाऊ शकते. याचे मूल्य रुपया किंवा डॉलरमध्ये नसते. तर याचे मूल्य हे सोन्याच्या वजनात राहत असल्याची माहिती आहे. पाच ग्रॅम सोन्याची जितकी किमत होते. तेवढीच किमत त्या बॉण्डची होणार असल्याची माहिती आहे. या खरेदीसाठी सेबीच्या अधिकृत ब्रोकरला इश्यू प्राईसचे पेमेन्ट करावे लागणार आहे.

किती सोने खरेदी करता येणार? कोणत्याही ग्राहकाला एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त जास्त 4 किलोग्रॅमपर्यंतच्या मूल्याच्या ब्रॅण्डची खरेदी करता येणार आहे. साधारणपणे कोणत्याही ट्रस्टसाठीच्या खरेदीसाठीची मर्यादा ही 20 किलोग्रॅम राहणार असल्याचीही माहिती यावेळी दिली आहे.

Related Stories

आघाडीवरच्या शंभर ब्रॅण्ड्सना मोठा फटका बसण्याची शक्यता

Patil_p

असंघटित कामगारांसाठी धोरण हवे

Omkar B

माजी सीईओ स्थापणार विमान कंपनी

Patil_p

‘हिरो’चा नफा 865 कोटी च्या घरात

Patil_p

नवी इनोव्हा क्रिस्टा बाजारात दाखल

Omkar B

हिंडाल्कोचा निव्वळ नफा घटला

Omkar B
error: Content is protected !!