तरुण भारत

खानापूर तालुक्यात शिवजयंती साधेपणाने साजरी

ज्ञानेश्वर मंदिरात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवजन्म सोहळा साजरा : विविध ठिकाणी शिवपुतळय़ाचे पूजन

प्रतिनिधी / खानापूर

Advertisements

कोरोना महामारीमुळे यावर्षीदेखील खानापूर शहर व तालुक्यात शिवजयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. येथील ज्ञानेश्वर मंदिरात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. या आदी उपस्थितांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजनही करण्यात आले. यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक गिरी, हरिभाऊ वाघधरे, उमेश वाघधरे, संतोष परमेकर, मोहन गावडे, पुंडलिक खडपे, सागर पाटील, अरुण परमेकर यासह इतर शिवभक्त उपस्थित होते. यावेळी बसवेश्वर महाराजांच्या फोटोचेही पूजन करण्यात आले.

  तसेच येथील शिवस्मारक आवारातही शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शिवस्मारक ट्रस्टचे श्रीकांत दामले व प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला. यानंतर उपस्थितांनी मानवंदना दिली.

 यावेळी बी. बी. पाटील, अजित पाटील, विनायक सावंत, विलास पाटील, प्रदीप जांबोटकर, महमद बेळगामी, महेश गिरी आदी उपस्थित होते. तसेच कर्नाटक राज्य शासनाच्यावतीने तहसीलदार रेष्मा तालीकोटी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच येथील लक्ष्मी मंदिराजवळ महालक्ष्मी शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवबसव जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गजानन कुंभार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तर रवी काडगी यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला. भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत बसवेश्वर महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली. यावेळी राज गावडे, किरण तुडयेकर, प्रसाद मांजरेकर, दत्ता वंजारी, नगरसेवक विनायक कलाल, मारुती जाधव, प्रभू गुरव, पंडित ओगले, राघवेंद्र गुरव, अनंत पाटील, साईल ओगले, संतोष गोरल, सोमनाथ गावडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित
होते.

 सध्याच्या या आणीबाणीच्या काळात छ. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेऊन प्रत्येक तरुणाने कार्यरत राहिले पाहिजे. कोरोना काळात गरीब जनतेची मोठी परवड होत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींने आपल्याला झेपेल तितकी मदत करावी, हीच खरी शिवजयंती ठरेल, असे प्रतिपादन युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले. यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष किरण पाटील, मारुती गुरव, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विशाल बुवाजी आदी उपस्थित होते.

Related Stories

कंग्राळी खुर्द ग्रामस्थांना कचरापेटीचे वितरण

Amit Kulkarni

हिंडलगा परिसरातील पथदीप बनले शोभेचे खांब

Amit Kulkarni

परतीच्या पावसामुळे शेतकऱयांची कामे ठप्प

Omkar B

मण्णूरला जोडणाऱया मुख्य रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत करून नावलौकिक मिळवावा

Amit Kulkarni

नियोजनाला कष्टाची जोड, दर्जेदार पिकांची लाभली साथ

Omkar B
error: Content is protected !!