तरुण भारत

मंत्री माविन गुदिन्हो यांची चिखलीच्या हॉस्पिटलला पुन्हा भेट, घेतला साधनसुविधांचा आढावा

प्रतिनिधी / वास्को

दाबोळीचे आमदार व राज्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी बुधवारी चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटलला भेट देऊन तेथील साधन सुविधा व कोरोना उपचारांसंबंधीत परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठ दिवसांत त्यांनी उपजिल्हा हॉस्पिटलला दिलेली ही दुसरी भेट आहे. चिखलीचे हॉस्पिटल हे सरकारीच राहणार असून या हॉस्पिटलचे खासगीकरण होणार नाही याचा त्यांनी पुनरूर्च्चार केला आहे.

Advertisements

चिखलीच्या हॉस्पिटलमधील डॉ. अनिल हुम्रसकर व इतर डॉक्टर्स व कर्मचाऱयांकडे त्यांनी सद्यस्थितीविषयी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात चिखलीचे सरपंच सॅबी परेरा तसेच चिखली व बोगमाळोचे पंच सदस्य व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांनी चिखली हॉस्पिटलमधील रूग्णांच्या सेवेसाठी समाजातील विविध दानशूर व्यक्ती आस्थापनांनी देऊ केलेल्या मदतीची माहिती दिली. आनंद बोस यांच्याकडून या हॉस्पिटलच्या सेवेसाठी ऑक्सिजन सिलिंडरसह सुसज्ज रूग्णवहिका उपलब्ध होणार आहे. गोवा शिपयार्ड, झुआरी इंडस्ट्रीज लिमिटेड, जेएसडब्ल्यू, ताज सॅटस् व इतर आस्थापनांकडून विविध वैद्यकीय साहित्य तसेच या हॉस्पिटलसाठी ज्या काही कमतरता भासत आहे त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. झुआरी इंडस्ट्रीज लिमिटेडकडून आज गुरूवारपासून दरदिवसा 25 ते 30 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मदतीमुळे हॉस्पिटलच्या अनेक अडचणी दूर होणार आहे अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. चिखलीच्या हॉस्पिटलचे चुकूनसुध्दा खासगीकरण होणार नाही याचा त्यांनी पुनरूर्चार केला. याविषयी आपण मुख्यमंत्र्यांकडे बोललो आहे असे ते म्हणाले.

Related Stories

सांगेतील ऊस उत्पादक पुन्हा एकदा संभ्रमावस्थेत

Amit Kulkarni

दाडाचीवाडी धारगळ येथे उपमुख्यमंत्री बाबू आजगावाकर यांचा निषेध

Amit Kulkarni

जुने गोवेतील बेकायदा बांधकामाविरोधात अमित पालेकर यांचे बेमुदत उपोषण सुरू

Patil_p

सत्तरीतील अडीज हजार शौचालय उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात

Patil_p

फोंडय़ात भरारीपथकातर्फे राजकीय बॅनर हटविण्याची मोहीम

Amit Kulkarni

ग्रामीण शिक्षक ते…ग्लोबल शिक्षकपर्यत मजल मारणारा डॉ. अशोक प्रियोळकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!