तरुण भारत

कोरोनाने अनाथ झालेली मुले आणि वृद्ध दाम्पत्यांची जबाबदारी दिल्ली सरकार घेणार : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  कोरोनामुळे अनाथ झालेली मुले आणि निराधार वृद्धांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोनामुळे ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावले आहे, अशा अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचे अरविंद केजरीवाल जाहीर केले आहे.

Advertisements


यासोबतच वृद्ध दाम्पत्यांचा खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. वृद्ध दाम्पत्यांचा कमवता मुलगा गेल्याने आता घर चालवण्यासाठी कुणी नाही. अशा कुटुंबांची मदत देखील दिल्ली सरकार करणार आहे. ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावले आहे. त्या मुलांनी चिंता करू नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.


दरम्यान, दिल्लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या  28 हजारांच्या पार पोहोचली होती. मात्र गेल्या 12 तासात कोरोनाबाधितांचा दर 12 टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण संख्या 3000 ने कमी झाल्याने रुग्णालयातील 3000 बेडही रिकामे आहेत. असे असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे  आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले आहे.

Related Stories

खाद्यतेल होणार स्वस्त; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

triratna

बिहार : दिवसभरात 408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

व्यावसायिक सिलिंडर 17 रुपयांनी महागला

Patil_p

”गेल्या ७५ वर्षात झालेलं काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे”

triratna

काश्मीर मुद्दा उपस्थित करणे पाकच्या अंगलट

Patil_p

पतंजलीच्या कोरोनिलला ‘आयएमए’चा आक्षेप

Patil_p
error: Content is protected !!