तरुण भारत

कंग्राळी बुद्रुकमधील गटारींचे सीडी वर्क काम अर्धवट

वार्ताहर / कंग्राळी बुदुक

गावच्या मध्य चौकामध्ये बांधण्यात येत असलेले सीडी गटारीचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे. ग्रा. पं. अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर सदस्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन सीडी गटारीचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता वाहतुकीला मोकळा करून प्रवासी वर्ग व नागरिकांना दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

Advertisements

गावच्या मध्य चौकामध्ये पूर्वी बांधलेली सीडी गटारींची रुंदी व उंची कमी असल्यामुळे सांडपाण्याचा निचरा या गटारीतून न होता गटारीमध्ये कचरा अडकून पाणी पुढे जाण्यास अडथळा होत होता. ग्रामस्थांच्या या मागणीची त्वरित दखल घेऊन ग्रा. पं. ने सदर सीडी गटार नव्याने बांधण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. परंतु जवळजवळ महिना झाला परंतु काम अगदी धिम्यागतीने सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सदर मध्य चौकातील सीडी गटारीचे काम सुरू असल्यामुळे नागरिक व दुचाकी, चारचाकी वाहनांना लक्ष्मी गल्लीमार्गे जावे लागत आहे. सदर सीडी गटारीवरून जाणाऱया अनेक वाहनधारकांची कुचंबणा होत आहे. कारण चव्हाट गल्लीतून बेळगावला जाण्याचा हा रस्ता आहे. गेल्या महिन्यापासून वाहनधारकांची मोठी कुचंबना होत आहे.

तेव्हा ग्रा. पं. संबंधित अधिकाऱयांनी सीडी गटारीचे काम त्वरित पूर्ण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून प्रवासीवर्ग व नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षण आवश्यक : के. डी. बिरादार

Omkar B

हरणाच्या अवयवांची तस्करी : दोघांना अटक

Amit Kulkarni

बसमधील वाढती गर्दी चिंताजनक

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीतर्फे 8 फेब्रुवारी रोजी ‘उन्नती 2020 एक पाऊल प्रगतीकडे’

Patil_p

तिसऱया लाटेच्या नियंत्रणासाठी उपाययोजना

Amit Kulkarni

आरपीडी महाविद्यालयाच्या तिघींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!