तरुण भारत

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

बेळगाव : स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी बेळगाव परिसरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले. यावषी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने जयंती कार्यक्रम करण्यात आला. सकाळी 6 वाजता संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. सुनील जाधव व राजू शेट्टी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी शंभूभक्त कै. अर्जुनराव गौंडाडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर संभाजी महाराजांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. रामलिंगखिंड गल्ली, लोकमान्य टिळक चौक, हेमू कलानी चौक, ताशिलदार गल्ली, छत्रपती शिवाजी उद्यान येथे पालखीची सांगता झाली.

यावेळी शिवप्रेमी गौरांग गेंजी, आदित्य पाटील, श्रीनाथ पवार, कामराज शहापूरकर, साईराज चौगुले, स्वयम् फडतरे, रोहित फडतरे, प्राची चौगुले, मानसी फडतरे, राणी चौगुले, बबिता फडतरे, उमा घाटकर, बाळकृष्ण घाटकर, ज्योतिबा धामणेकर, विनायक शेट्टी यांसह शिव-शंभूप्रेमी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

व्ही. के. सनमुरी यांचे कार्य कौतुकास्पद

Omkar B

रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या जीवनाला कंटाळून टोकाचा निर्णय

Omkar B

रामतीर्थनगरमध्ये समाजभवन उभाण्याचा प्रस्ताव कागदावरच ?

Patil_p

भारतनगर वडगाव परिसरात वृक्षारोपण

Amit Kulkarni

केएलई-टिळकवाडी क्लब आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

कर्नाटकात कोरोनाचे ६,६७० नवीन रुग्ण तर १०१ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!