तरुण भारत

ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनाने निधन

ऑनलाईन टीम / कोलकाता : 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ असीम बॅनर्जी यांचे आज सकाळी कोरोनाने निधन झाले.

Advertisements

असीम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोलकात्यातील मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  तेथे मागील महिनाभरापासून ते उपचार घेत होते. त्यांची ऑक्सिजन लेवल खूप कमी होती. अखेर उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. निमाताला स्मशानभूमीत कोविड प्रोटोकॉलअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Stories

कूचबिहार गोळीबार प्रकरणी धक्कादायक खुलासा

Patil_p

रामलल्लाच्या दर्शनाला प्रतिदिन लाख भाविक येणार

Omkar B

अहमदाबादमध्ये ‘हाउडी ट्रम्प’!

Patil_p

पत्रकार रोहित सरदाना यांचे हार्ट ऍटॅकने निधन

Patil_p

तामिळनाडूत चक्रीवादळाचे थैमान

Patil_p

न्यायपालिकेत महिलांची हिस्सेदारी वाढविण्यात यावी

Patil_p
error: Content is protected !!