तरुण भारत

पंतप्रधान मोदींनी राज्यांना व्हेंटिलेटरसंदर्भात दिला महत्वाचा आदेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोना परिस्थिती, कोरोना लसीकरण व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याबैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेंटिलेटरसंदर्भात काही राज्यांना कडक सूचना दिल्या कारण स्टोरेजमध्ये असे व्हेंटिलेटर आहेत जे आतापर्यंत वापरलेले नाहीत. व्हेंटिलेटर बाबत देशभरातून अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे स्टोरेजमध्ये असलेले व्हेंटिलेटर त्वरित बसविण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले.

पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत पंतप्रधानांनी व्हेंटिलेटरसंदर्भात काही राज्यांना कडक सूचना दिल्या कारण व्हेंटिलेटर ठेवून आहेत जे आजपर्यंत वापरलेले नाहीत. हे व्हेंटिलेटर त्वरित बसविण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. बैठकीत पंतप्रधानांना देशातील लसीकरणाच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. या व्यतिरिक्त लसीच्या उपलब्धतेवरही चर्चा झाली. लसीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना राज्य सरकारांशी जवळून काम करण्यास सांगितले.

याआधी बुधवारी पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठा आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जात आहे, म्हणून जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा लस घ्या, असे आवाहन त्यांनी केले होते.

Advertisements

Related Stories

मुरादाबाद मध्ये डॉक्टरांवर हल्ला, योगी सरकारकडून दोषींवर कारवाई चे आदेश

prashant_c

मास्क लावूनच घराबाहेर पडा

Patil_p

काँग्रेस-झामुमोत फूट? मुख्यमंत्री सोरेन दिल्लीत

Patil_p

उत्तर प्रदेशात मागील चोवीस तासात 480 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

डॉ. सुधाकर यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा

Omkar B

संयुक्त राष्ट्रात भारताची चीनवर मात

Patil_p
error: Content is protected !!