तरुण भारत

‘तौत्के’ चक्रीवादळ होणार आणखी तीव्र

ऑनलाईन टीम / मुंबई : 

‘तौत्के’ चक्रीवादळ पुढील तीन तासात अधिक तीव्र रूप धारण करणार आहे. त्याचा वेग ताशी 115 किमी पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Advertisements

हे चक्रीवादळ सध्या गोव्यापासून 290 किमी, मुंबईपासून 650 तर गुजरातपासून 880 किमी दूर आहे. हे वादळ आता मुंबई आणि गोव्याच्या दिशेने येत आहे. त्याचा वेग ताशी 13 किमी असून, पुढील तीन तासात त्याची तीव्रता वाढणार आहे. पुढील 12 तासात हे वादळ अतितीव्र रूप धारण करेल. 

रविवारी हे वादळ कोकण किनारपट्टीवरून गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

ज्योतिरादित्य सिंदिया कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींची ‘डील’

Patil_p

दिलासादायक! देशात मागील 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांखाली

datta jadhav

अखेरच्या दोन टप्प्यांमध्ये काँग्रेस अन् तृणमूलमध्ये लढत

Patil_p

ओबीसी आरक्षणासंबंधी उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी

Patil_p

मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

datta jadhav
error: Content is protected !!