तरुण भारत

राशिभविष्य

रविवार दि.16 ते शनिवार दि.22 मे 2021

मेष

Advertisements

या सप्ताहात सूर्य, प्लूटो त्रिकोणयोग, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. शेतकरी वर्गाच्या मालाला चांगली किंमत मिळेल. जुनी थकबाकी वसूल करा. कर्जाचे काम करून घ्या. नोकरीत मर्जी राहील. संसारात शुभघटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्याचा योग्य प्रकारे विस्तार करू शकाल. कलाक्षेत्रात प्रगती वाढेल. स्पर्धेत पुढेच रहाल.

वृषभ

या सप्ताहात चंद, मंगळ युती, शुक्र, शनि त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. मोठे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करा. भागिदार मिळेल. नोकरीत प्रभाव वाढेल. नवीन ओळखी होतील, घर, जमीन या संबंधी कामे करून घ्या. संसारात सौख्य मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची लोकप्रियता वाढेल. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. कला क्षेत्रात चमकाल.

मिथुन

या सप्ताहात चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात जास्त मोह ठेवू नका. हिशोब चुकेल, सावध रहा. संसारात क्षुल्लक वाद, चिंता होईल. नम्रता ठेवा. नोकरीत जवळचे लोक समस्या करतील. राजकीय, सामाजिक कार्यात रागावर ताबा ठेवा. कायदा मोडेल, असे वक्तव्य व कृती करू नका. स्पर्धा कठीण असेल.

कर्क

सूर्य, प्लूटो त्रिकोण योग, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. प्रवासात घाई करू नका. संयमाने बोला. तुमची कामे करून घेता येतील. धंद्यात फायदा होईल. व्यसन टाळा. नोकरीत काम वाढले तरी प्रभाव दिसेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांना तुमचे विचार पटवून देता येतील. व्यर्थ वेळ दडू नका. संसारातील कामे होतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह

या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यातील कामे करून घ्या. वसुली करा. कर्जाचे काम करता येईल. नोकरीत वरि÷ांची मर्जी राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवता येईल. कठीण प्रश्नावर चर्चा मसलत करून प्रश्न सोडवता येईल. नवीन ओळखी होतील. कलाक्षेत्रात कल्पनाशक्ती वापरता येईल. संसारात आनंदी रहाल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.

कन्या

या सप्ताहात सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. संयमाने राहून कोणताही कठीण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. धंद्यात फायदा होईल. ओळखीतून कामे मिळतील. नोकरीत टिकाव लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करू शकाल. योग्य व्यक्तीचा विचार घेत चला. व्यसन नको. कला, क्रीडा साहित्यात प्रगती होईल. शिक्षणात प्रयत्न करा.

तुळ

या सप्ताहात चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोला. मोहाला बळी पडू नका. पर्स सांभाळा. नोकरीत कायदा पाळा. अरेरावी करू नका. संसारात क्षुल्लक वाद होईल. खर्च वाढेल. राजकीय- सामाजिक कार्यात जबाबदारी  वाढेल. जवळचे नेते, सहकारी काडय़ा घालतील. राग आवरा. कला, क्रीडा, क्षेत्रात फसगत टाळा. पोटाची काळजी घ्या.

वृश्चिक

या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, शनि त्रिकोण योग होत आहे. प्रवासात घाई करू नका. रागावर ताबा ठेवा. धंद्यात काम मिळेल. अडचणी छोटय़ा असतील. वसुली करा. नोकरीत कामाचा प्रभाव दिसेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावरील आरोप दूर करण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. कला क्षेत्रात विशेष काम करू शकाल. स्पर्धेत प्रगती होईल.

धनु

या सप्ताहात चंद्र, मंगळ युती, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात वाद होईल. सावध रहा. हिशोब नीट करा. संसारात  कामे वाढतील. वृद्धांची काळजी घ्यावी लागेल. स्वतःची प्रकृती सांभाळा. वाटाघाटीत तणाव, फसगत होऊ शकते. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. वरि÷ांचा दबाव राहील. स्पर्धा कठीण आहे. अभ्यासात आळस करू नका. कायदा सर्वत्र पाळा.

मकर

या सप्ताहात सूर्य, प्लूटो त्रिकोणयोग, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. वादाचे प्रसंग कुशलतेने टाळा. धंद्यात काम मिळेल. ओळखी वाढतील. वसुली करा. रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. नोकरीत काम वाढेल. दगदग होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकतंत्र सांभाळता येईल. कलाक्षेत्रात प्रगती कराल. क्रीडा, साहित्य शिक्षणात पुढे जाल.

कुंभ

या सप्ताहात चंद्र, गुरु प्रतियुती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोला. वस्तू नीट सांभाळा. नोकरीत तणाव होईल. आरोप येईल. मैत्रीत गैरसमज होईल. संसारात नाराजी होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वृद्धांना सांभाळावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. स्पष्टवक्तेपणा कमी ठेवा. तटस्थ रहा. अभ्यासात आळस नको. मोह आवरा.

मीन

या सप्ताहात सूर्य, प्लुटो त्रिकोण योग, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. वाढ होईल. वसुली गोळा करा. प्रेमाच्या जाळय़ात फसू नका. नोकरीत  कायद्यानुसार कामे करा. संसारातील कर्तव्य पूर्ण करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात पुढे जाल. परंतु घातक निर्णय घेऊ नका. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात जास्त मेहनत घ्या. नवीन ओळख चांगली वाटेल.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 30 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 फेब्रुवारी 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p
error: Content is protected !!