तरुण भारत

मूळ भारतीय असणाऱया डॉ.शकुंतला हरकसिंह यांना ‘जागतिक खाद्य पुरस्कार’

वॉशिंग्टन –

 मूळ भारतीय वंशाच्या असणाऱया जागतिक पोषण विशेषतज्ञ डॉ. शपुंतला हरकसिंह थिलस्टेड यांना वर्ष 2021 मधील ‘जागतिक खाद्य पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. डॉ.शंकुतला यांनी समुद्र भोजन आणि खाद्य तंत्रसाठी समग्र आणि पोषणासाठी संवेदनशील दृष्टीकोन विकसित केला असून या कार्यासाठीच हा पुरस्कार त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार जागतिक खाद्य पुरस्कार मिळवलेल्या डॉ.शकुंतला यांच्याकडून बांगलादेशमधील लहान माशांच्या प्रजातीवर विविध पातळीवर संशोधन करण्यात आले असून यातून समुद्र भोजन प्रणालीसाठी पोषणासंदर्भात संवेदनशील दृष्टीकोन विकसित करण्यात त्या यशस्वी झाल्या असल्याची माहिती आहे. या संशोधनाच्या मदतीने आशिया आणि आफ्रिकामध्ये राहणाऱया लहान गरीब लोकांना मोठय़ा प्रमाणात पोषण आहार प्राप्त होणार असल्याचेही संकेत आहेत. 71 वर्षीय डॉ.शपुंतला यांनी हा पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Advertisements

Related Stories

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

Patil_p

पाकच्या लष्करी मुख्यालयाजवळ बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू

datta jadhav

संसर्ग पुन्हा नियंत्रणात

Patil_p

एअरस्ट्राईकची भीती, पाकचा युद्धाभ्यास

Patil_p

3 भारतीय कंपन्यांना व्हेंटिलेटर निर्मितीचा परवाना

Patil_p

पाकिस्तान एअर फोर्समध्ये पहिल्यांदाच हिंदू पायलट दाखल

prashant_c
error: Content is protected !!