तरुण भारत

व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन यांची नियुक्ती

वॉशिंग्टन  –

भारतीय-अमेरिकन असणाऱया नीरा टंडन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टंडन यांनी दोन महिन्या अगोदर रिपब्लिक सीनेटरांच्या विरोधामुळे व्हाईट हाऊस व बजट कार्यालयातील संचालक पदासाठीचे आपले नामांकन मागे घेतले होते. टंडन सध्याच्या कालावधीत सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रॅमच्या(कॅप) अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच कॅपच्या संस्थापक आणि संचालक पोडेस्टा यांनी म्हटल्याप्रमाणे नीरा या बुद्धीमान, दृढता आणि राजकीय समज असणाऱया बायडन प्रशासनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून आपला कार्यकाल पूर्ण करतील असाही विश्वास यावेळी स्पष्ट केला आहे. या अगोदर टंडन या अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा मंत्रालयातील आरोग्य सुधारणा विभागात वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. तसेच त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळातही विशेष कार्य केल्याची माहिती आहे. यामुळे टंडन यांच्या अनुभवाचा बायडेन प्रशासनाला अधिकच लाभ होणार असल्याचा विश्वास विविध स्तरामधून व्यक्त केला जात आहे.

Advertisements

Related Stories

पाकिस्तानात बजबजपुरी

tarunbharat

अमेरिकेत 50 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

रशियात ‘कोरोनावीर’ औषधाला मंजुरी

datta jadhav

पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्यामुळे दोन पाकिस्तानी पत्रकारांना नारळ

datta jadhav

पाकिस्तानात 50 वैमानिकांचे बनावट परवाने रद्द

datta jadhav

सौदीतील भारतीयांवर उपासमारीची वेळ

datta jadhav
error: Content is protected !!