तरुण भारत

सर गंगाराम यांचे समाधीस्थळ 10 वर्षांनंतर सर्वसामान्यांसाठी खुले

लाहोर

 प्रख्यात हिंदु समाजसेवी आणि मुख्य वास्तूकार सर गंगाराम यांचे लाहोरमधले समाधीस्थळ हे चालू महिन्याच्या अखेरीस सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दहा वर्षांच्या अगोदर काही लोकांनी या ठिकाणावर अवैधस्वरुपात कब्जा केला होता. परंतु प्रशासनाने या स्थळावरील कब्जा आता हटवला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले आहे. पंजाब प्रांतामधील लाहोर येथे टक्साली गेटजवळ सर गंगाराम यांची समाधी आहे. लोकांच्या एका समूहाद्वारे या ठिकाणी अवैध स्वरुपात कब्जा करण्यात आला होता. यामुळे मागील दशकापासून सदरचे स्थळ बंद ठेवण्यात आले होते. इवॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे उपसंचालक फराज अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आम्ही काही लोकांच्या समूहातील बंधनामधून सदरची जमीन ही परत घेतली आहे आणि सर गंगाराम यांची समाधी जीर्णोद्वार करणार असल्याचेही नमूद केले आहे. यामुळे चालू महिन्यात ही समाधी सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुली होणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

Related Stories

नेपाळच्या राजकारणात चीनचा पुन्हा हस्तक्षेप

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या दबावामुळे अखेर गुगलने मानली हार

Patil_p

कैदी नसल्याने तुरुंगांचे आलिशान हॉटेलात रुपांतर

Patil_p

ट्रम्प विरोधात पुन्हा लढणार : बायडेन

datta jadhav

अमेरिकेचा चीनला दणका : संसदेत डीलिस्टिंग विधेयक मंजूर

Omkar B

डॉ. फैसल सुलतान पाकचे नवे आरोग्यमंत्री

datta jadhav
error: Content is protected !!