तरुण भारत

सांगली : अत्यावश्यक कामाशिवाय फिरत असल्यास 500 रूपये दंड – जिल्हाधिकारी

दंडात्मक कारवाईसाठी पोलीस प्रशासनास अधिकार प्रदान

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. नाकाबंदी तसेच इतर कारवाईच्यावेळी पोलिसांना कोणी नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाला मिळण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रूपये इतकी दंडात्मक कारवाई करावी. तसेच त्या व्यक्तींच्या ताब्यातील वाहन संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू असेपर्यंत किंवा केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोविड-19 साथरोग आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी ताब्यात घेण्यात यावे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जारी केले आहेत.

Related Stories

सांगली : विद्यमान नगरसेवकाच्या भावासह स्टेट बँकेतील कर्मचार्‍याला कोरोना

Abhijeet Shinde

Be positive : कुपवाडमध्ये ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

Abhijeet Shinde

गॅस पंप बंद झाल्याने सांगलीतील सात हजार रिक्षाचालक चिंतेत

Abhijeet Shinde

सांगली : ‘विद्यामंदिर’चे माजी मुख्याध्यापक ग्रामोपाध्ये सरांचे निधन

Abhijeet Shinde

राज्य सरकार आणि धनगर समाज संघर्ष अटळ:आ पडळकर

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू, नवे 830 रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!