तरुण भारत

कंग्राळी बुदुक येथे सॅनिटायझरची फवारणी

वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक

गावामध्ये कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी ग्राम पंचायतने कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. गावामध्ये कोरोना संशयीत रुग्ण आढळत असल्यामुळे कोरोना महामारीचा बिमोड करण्यासाठी संपूर्ण गावातील गल्ल्यांमध्ये कोरोना जंतूनाशक फवारणी शनिवारी करण्यात आली. ग्राम पंचायत सदस्या भारता पाटील व ग्राम पंचायत सदस्य तानाजी पाटील यांनी स्वतः रिक्षामधून स्वतः फवारणी केली.

Advertisements

नागरिकांची सावधगिरी महत्त्वाची

जे लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहे. मृत्यूमुखी पडत आहेत. त्यांनाच कोरोना म्हणजे काय ते कळत आहे. सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये दाखल झाल्यावर त्या पेशंटला बरे करण्यासाठी काय झुंझ द्यावी लागत आहे ते त्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबियांना समजत आहे. लाखो रुपये खर्च करून सुद्धा रुग्ण हाती लागणे मुश्किल होत चालले आहे. तेव्हा स्वतःच्या जीवांचे रक्षण करणे हे आपल्याच हाती आहे. तेव्हा कोरोना साधारण महामारी न समजता शासन आवाहन करत असलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करुन आपल्या अनमोल जीव वाचवा असेही यावेळी आवाहन करण्यात आले.

Related Stories

हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या प्रचारासाठी वाहन फेरी

Patil_p

स्विटमार्ट – बेकरी पदार्थांवर एक्स्पायरी डेट नाही

Patil_p

राज्य कुस्ती स्पर्धेसाठी सुलेमान सनदी यांची निवड

Amit Kulkarni

हालगा येथील मोहरमला साधेपणाने सुरुवात

Patil_p

मच्छे येथे जुगारी अड्डय़ावर छापा; 12 जणांना अटक

Patil_p

खासगी कंपनीच्या बसमधून 50 लाखाची रोकड जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!