तरुण भारत

अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांना प्रवेशबंदी

कोगनोळी तपास नाक्मयावर बंदोबस्त कायम

वार्ताहर/ कोगनोळी

Advertisements

   येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱया कोगनोळी फाटय़ावरील कर्नाटक सीमा तपासणी नाक्मयावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. अत्यावश्यक सेवा व मालवाहतूक वगळता अन्य कोणालाही कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. मात्र सीमाभागातील महाराष्ट्रातील प्रवाशांची फारच गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र व अन्य राज्यातून कर्नाटकात वैद्यकीय सेवा, रुग्ण, अत्यावश्यक सेवा इत्यादी लोकांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. गेल्या चार दिवसात विनाकारण फिरणाऱया मोटारसायकल स्वारांवर कारवाई करुन दुचाकी जप्त केल्या आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर पोलीस कारवाई करण्यात येत आहे.

  गेल्या दोन दिवसात महाराष्ट्र व अन्य राज्यातून 500 हून अधिक प्रवाशांनी प्रवेश घेतला आहे. यातील काहींनी कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व गोवा राज्यात प्रवेश घेतला आहे. सीमावरती असणाऱया महाराष्ट्रातील आजरा, गडहिंग्लज, चंदगड, उत्तूर या ठिकाणी जाणाऱया प्रवाशांची सीमा तपासणी नाक्मयावर मोठी गैरसोय होत आहे. त्याचबरोबर सीमाभागातील कर्नाटकातील काही गावांचा वैद्यकीय क्षेत्रासह बँकिंग क्षेत्रातील संबंध थेट महाराष्ट्राशी येत असल्याने यासाठी जाणाऱया नागरिकांना मोठा त्रास होऊ लागला आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात व कर्नाटकातून महाराष्ट्रात ये-जा करत असणाऱया रुग्णवाहिकाही याठिकाणी तपासण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्रात असणाऱया कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत व पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत येथे कामासाठी जाणाऱया कर्मचाऱयांना त्यांचे ओळखपत्र बघूनच सोडण्यात येत आहे.? एकंदरीत कोगनोळी फाटय़ावरील सीमा तपासणी नाक्मयावर कडक बंदोबस्त ठेवल्याने याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.

मंडल पोलीस निरीक्षक आय.एस. गुरुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी.एस. तळवार यांच्यासह अधिकारी, पोलीस कर्मचारी व होमगार्ड रात्रंदिवस सेवेत गुंतले आहेत.

Related Stories

चिकोडी येथे बंदला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

दुर्लक्ष केल्यास अधिकाऱयांवर दंडात्मक कारवाई

Patil_p

लॉकडाऊन शिथिलनंतर चोऱया वाढल्या

Patil_p

नाझर कॅम्प तलावात विसर्जनास बंदी

Amit Kulkarni

शहरातील आरओ प्लँट ठरले कुचकामी

Omkar B

रस्त्यात सापडलेले पर्स संबंधितांना केले परत

Amit Kulkarni
error: Content is protected !!