तरुण भारत

बेडचा तुटवडा, रुग्णांचे हाल, नातेवाईकांची धावपळ

वार्ताहर/ निपाणी

निपाणी शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱया रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. मृत्यचे प्रमाणदेखील नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कोरोना संसर्ग आणि कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. निपाणीत असलेल्या शासकीय व खासगी कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी बेडची मागणी वाढतच आहे. यामुळे अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापन आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. याची दखल घेत तालुका  प्रशासन आणि आरोग्य विभागाने बेड, ऑक्सिजनची सोय

Advertisements

निपाणी शहरात गांधी रुग्णालय, जोल्ले कोविड केअर सेंटर येथे शासकीय पातळीवर तर विश्वास हॉस्पीटल, दानेश्वरी, जीव आयसीयु., व निर्मळे हॉस्पीटल येथे खासगी तत्वावर कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन व सर्वसाधारण असे बेड आहेत. मात्र हे सर्व बेड सध्या फुल्ल आहेत. शिवाय निपाणी तालुक्याबरोबरच चिकोडी, रायबाग, अथणी, कागवाड, जमखंडी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णदेखील उपचारासाठी दाखल होत आहेत. यामुळे निपाणीत बेडची कमतरता भासत आहे.

येथील श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीतील महाऑक्सी या ऑक्सिजन सेंटरमध्ये शासकीय अधिकाऱयांच्या देखरेखीखाली ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा सुरु आहे. ऑक्सिजनची निर्मिती आणि यावर अवलंबून असणाऱया कोविड सेंटरची संख्या अधिक आहे. याबरोबरच अन्य खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो.निपाणीतून पाच तालुक्मयांना ऑक्सिजनची सोय करण्यात येत आहे. दरम्यान निपाणीत आणखीन बेडची व्यवस्था, अत्यावश्यक उपचार सुविधा आवश्यक आहेत.

अनेक रुग्ण उपचाराअभावी दगावले

खासगी कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी असलेली उपचार सुविधा महान  आहेत. याशिवाय ऑक्सिजन बेड सर्वच ठिकाणी फुल्ल आहेत. याबरोबरच जोल्ले कोविड सेंटर आणि महात्मा गांधी रुग्णालयातही असलेले बेड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे फुल्ल आहेत. यामुळे निपाणी तालुक्मयातील अनेक रुग्णांना उपचारासाठी नजीकच्या कोल्हापूर, कागल किंवा मुरगूड याठिकाणी बेडची उपलब्धता करुन त्याठिकाणी उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. याबरोबरच व्हेंिटलेटरची शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्याने अस्वस्थ रुग्णांना अन्यत्र हलवावे लागत आहे. यातून रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

तालुका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत

वाढती रुग्णसंख्या, वाढते मृत्यूचे प्रमाण आणि उपचाराच्या नितांत गरज याची दखल घते तालुका प्रशासनाने निपाणी शहरात शासकीय कोविड सेंटरची संख्या वाढविण्याबरोबरच येथील बेड, ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा आणि व्हेंटिलेटर व रेमडीसिव्हर इंजेक्शनाचा पुरठवा योग्य पद्धतीने होताना सामान्य रुग्णानांही उपचाराची सोय होईल. यासाठी तालुका प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलताना आरोग्य विषयक सुविधा मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणीही होत आहे.

खासगी रुग्णालयात कोविड उपचार खर्चाचा तपशील लावावा

निपाणी शहरासह तालुक्मयात कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याबरोबरच तालुक्मयात कोरोना मृतांचा आकडा 70 च्या वरती पोहचला आहे. तसेच खासगी कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांवर उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेरचा आहे. तसेच महाराष्ट्राप्रमाणे प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये बाधितांवर येणाऱया खर्चाचा तपशील लावल्यास रुग्णांसह नातेवाईकांना सोयीस्कर होईल, अशी मागणीही होत आहे.

सकारात्मक रहा, सुरक्षित रहा…

निपाणीसह सर्वत्र वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या व मृत्यूदरदेखील काहीसा कमी होत आहे. याचा सकारात्मक विचार करुन प्रत्येकाने सुरक्षित रहावे, असे दानेश्वरी कोविड सेंटरचे पुष्कर तारळे यांनी सांगितले.

Related Stories

मंथनच्या अध्यक्षपदी शोभा लोकूर

Patil_p

कोरोना पॉझिटिव्ह असूनही कुटुंबासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला केलं रुग्णालयात दाखल

Shankar_P

शिवप्रतिष्ठानतर्फे 28 रोजी हुतात्म्यांना श्रद्धांजली

Patil_p

नाथ पै चौकात पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात

Amit Kulkarni

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Rohan_P

पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दोन अर्ज दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!