तरुण भारत

‘2-डीजी’ ठरणार ऑक्सिजनला पर्याय!

‘डीआरडीओ’ची निर्मिती – पुढील आठवडय़ात लाँच होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

‘डीआरडीओ’ने (संरक्षण संशोधन व विकास संघटना) विकसित केलेले 2-डीऑक्सी-डी-ग्लुकोज (‘2-डीजी’) हे नवीन औषध लवकरच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरात आणले जाणार आहे. प्रायोगिक चाचण्यांमध्ये या औषधाने कोविड विरुद्ध प्रभावी परिणाम दर्शविल्याने ते कोविड रुग्णांच्या उपचारांमध्ये गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. पुढील आठवडय़ात अँटी-कोविड औषध ‘2-डीजी’चे 10 हजार डोस बाजारात उपलब्ध होणार आहेत. या औषधाच्या वापरामुळे कोरोना विषाणूच्या महामारीच्या दुसऱया लाटेशी लढा देणारा भारत आता पूर्वीपेक्षा अधिक सक्षमपणे सामोरा जाऊ शकतो.

कोरोनाच्या दुसऱया लाटेने देशात उग्र रुप धारण केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. पण देशात लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनची कमतरताही जाणवत आहे. लसीकरणात भर टाकण्यासाठी पुढील आठवडय़ापासून स्फुटनिक लस बाजारात उपलब्ध होणार आहे. त्याव्यतिरिक्त उपचारांसाठी ‘रामबाण’ ठरणारे ‘2-डीजी’ हे औषधही बाजारात उपलब्ध होणार असल्यामुळे कोरोनाबाधितांना बराच दिलासा मिळू शकेल, असा विश्वास संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी हे औषध परिणामकारक असून ऑक्सिजनवर असणाऱया रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात या औषधाचे उत्पादन वेगाने करण्यासाठी काम करीत असल्याची माहिती ‘डीआरडीओ’ने दिली आहे.

पावडर स्वरुपात पॅकेटमध्ये उपलब्ध

‘2-डीजी’ हे औषध पावडर स्वरुपात पॅकेटमध्ये उपलब्ध असेल. ते पाण्यामध्ये विरघळवून प्यावे लागते. डीआरडीओच्या पथकाने हे औषध विकसित केले आहे. डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा या तीन वैज्ञानिकांचा याच्या निर्मितीत मोठा सहभाग होता. संकटाच्या वेळी एक वरदान म्हणून या औषधाकडे पाहिले जात आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे मोठय़ा संख्येने रुग्णांना ऑक्सिजन आणि रुग्णालयात दाखल करण्यात यात आहे. या पार्श्वभूमीवर हे औषध जीव वाचवण्यासाठी बहुमोल असणार आहे. कारण ते संक्रमित पेशींवर कार्य करते. हे कोरोनाबाधिताचा हॉस्पिटलायझेशन कालावधी कमी करते….

ऑक्सिजनची गरज कमी करते !

कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी 2-डीजी प्रभावी असून हे औषध रुग्णांना त्वरित पुनर्प्राप्त करण्यास मदत करते. तसेच ऑक्सिजनवरील त्यांची गरज कमी करते. या औषधाच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून परिणामकारकताही सिद्ध झाल्याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱयांनी दिली. चाचणीपूर्वी तीन दिवस आधी रुग्णांना ऑक्सिजन देणे बंद करण्यात आले होते. त्यानंतरही 2-डीजी प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

आज पंतप्रधान मोदींची काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

पश्चिम बंगाल : आसनसोलमध्ये चार जणांची निर्घृण हत्या

Rohan_P

101 वर्षांनंतरही हुतात्म्यांचा आकडा नाही माहिती

Patil_p

यूपीएससीचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात अव्वल

Rohan_P

CBSC BORD : बारावीच्या निकालाबाबत शाळांना दिला नवा आदेश

Rohan_P

अमेरिकेने मोदींकडे सुपूर्द केल्या 157 पुरातन वस्तू

datta jadhav
error: Content is protected !!