तरुण भारत

जपान, अमेरिका, फ्रान्सचा युद्धसराव

टोकिओ / वृत्तसंस्था

चीनी समुद्र आणि प्रशांतीय महासागरात चीनच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता अमेरिका, फ्रान्स आणि जपान या देशांच्या सेना दलांनी शनिवारी जपानच्या किरीशिमा भागात युद्धसराव केला. या सरावात या तिन्ही देशांच्या शेकडो सैनिकांनी भाग घेतला. तसेच वाहतूक विमाने, हेलिकॉप्टर्स, युद्ध विमाने आणि संपर्क साधने यांचेही साहाय्य या सरावात घेण्यात आले.

Advertisements

हा युद्धसराव गुरूवारपासून सुरू आहे. शनिवारी यात ऑस्ट्रेलियाच्या सैनिक तुकडय़ांनीही भाग घेतला. या चारही देशांच्या अकरा मोठय़ा युद्धनौका सध्या दक्षिण चीनी समुद्रात कार्यरत आहेत. अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू नौकाही येथे आणल्या आहेत. चीनने आक्रमपणाने दक्षिण चीन समुद्रात आपले हातपाय पसरण्याचे धोरण अवलंबिल्याने जपानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

फ्रान्सचा प्रथमच समावेश

अशा प्रकारच्या युद्धसरावात फ्रान्सने बऱयाच वर्षांनी प्रथम सहभाग घेतला. फ्रान्सची काही बेटे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात आहेत. त्यांनाही चीनपासून धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या देशाने आपल्या बेटांच्या संरक्षणाची सज्जता ठेवली आहे. या बेटांवर सैनिक नियुक्त झाले आहेत.

मुक्त प्रदेशासाठी प्रयत्न

दक्षिण चीन समुद्री प्रदेश आणि प्रशांत महासागरीय प्रदेश कोणाच्याही अधिपत्यात असू नयेत. तेथे सर्वांना मुक्त प्रवेश असावा, अशी अमेरिकेची भूमिका आहे. तर चीनने गेली 20 वर्षे या भागावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जपानला चीनचा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे त्या देशाने आता आपल्या संरक्षणासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

Related Stories

घोडय़ावरून रानोमाळ हिंडणारी आजी

Patil_p

पाकिस्तानच्या सीनेटमध्ये पहिले शिख सदस्य बनले गुरदीप सिंह

Patil_p

व्हिएतनाम : 3 महिन्यांनी आढळला रुग्ण

Patil_p

जमावाने पाडलेले हिंदू मंदिर पाकिस्तान पुन्हा उभारणार

datta jadhav

रशियात मॅकेनिककडून ‘ड्रगन कार’ची निर्मिती

Patil_p

UAE कडून मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav
error: Content is protected !!