तरुण भारत

देशात चार महिन्यात दिले 18 कोटी डोस

 शुक्रवारी एकाच दिवसात 11 लाख लोकांना लस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात शुक्रवारपर्यंत 18 कोटी 4 लाख 57 हजार 579 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 11 लाख 3 हजार 625 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत 31.30 कोटीहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून गेल्या चार महिन्यांपासून वेगवेगळय़ा वयोगटातील नागरिकांना लस दिल्या जात आहेत.

भारतात 119 दिवसांत 18 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस दिला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 13 कोटी 93 लाख 61 हजार 21 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 4 कोटी 10 लाख 68 हजार 240 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस देण्यात आला. भारतात आतापर्यंत 18 कोटी 4 लाख 29 हजार 261 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस देण्यात आला आहे.

देशातील 96 लाख 27 हजार 199 आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांना (हेल्थकेअर वर्कर्स) कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 66 लाख 21 हजार 675 आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांना (हेल्थकेअर वर्कर्स) कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. भारतातील 1 कोटी 43 लाख 63 हजार 754 प्रंटलाईन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 81 लाख 48 हजार 757 प्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. भारतातील 18 ते 44 वयोगटातील 42 लाख 55 हजार 362 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात येत आहे. मात्र, सध्या लसींच्या अपुऱया पुरवठय़ामुळे लसीकरण संथपणे सुरू आहे.

देशातील 45 ते 60 वयोगटातील 5 कोटी 67 लाख 99 हजार 389 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच या वयोगटातील 87 लाख 50 हजार 224 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले. भारतातील 60 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 5 कोटी 43 लाख 15 हजार 317 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच या वयोगटातील 1 कोटी 75 लाख 47 हजार 584 जणांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देण्यात आले.

Related Stories

बंगालच्या जनतेला हवी अत्याचारांपासून मुक्ती

Patil_p

आयफाचे 700 कोटी वापरणार

Patil_p

देशात दिवसभरात 991 नवे रूग्ण

Patil_p

या देशात काहीही घडू शकतं

Patil_p

गिरिराज सिंग यांचे वादग्रस्त विधान

Patil_p

चीन-पाक सैन्यासोबत युद्धाभ्यास नाही! भारताची रशियाला स्पष्टोक्ती :

Patil_p
error: Content is protected !!