तरुण भारत

ग्रामीण भागातील संसर्ग रोखा!

घरोघरी सर्वेक्षण करण्याची पंतप्रधानांची सूचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोनाच्या दुसऱया लाटेतील संसर्ग थोपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कोरोना प्रभावित भागात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याबरोबरच ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच स्थानिक कंटेनमेंट झोन बनवा, कोरोना संसर्ग वाढलेल्या भागात घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या करा, ग्रामीण भागात कोरोनाशी लढण्यासाठी सुविधा तयार करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या.

पंतप्रधानांनी शनिवारी कोरोनासंदर्भातील महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी देशाच्या विविध भागातील कोरोना संसर्गाची स्थिती आणि लसीकरणविषयक आकडेवारीचीही पडताळणी केली. त्यानंतर बाधितांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आली. यापूर्वी बुधवारी पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर त्यांनी देशभरातील सरकारी रुग्णालयातील मोफत लसीकरणाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी यांचा सहभाग होता.

बाधितांचे आकडे लपवू नका!

आरटी-पीसीआर आणि अन्य वैद्यकीय चाचण्यांच्या माध्यमातून संसर्गबाधितांचा शोध घेण्यात यावा. बाधितांचा वेळीच शोध लागल्यास संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. त्यानुसार कुठल्याही प्रकारचा दबाव न ठेवता राज्यांनी लपवाछपवी न करता बाधितांची अचूक आकडेवारी सादर करावी, अशी सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱयांना केली आहे. बाधितांचे अहवाल दडपल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊन अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पंतप्रधानांनी व्यक्त केली.

खेडय़ांमध्ये सुलभ भाषेत मार्गदर्शन करा!

पंतप्रधानांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश बैठकीमध्ये दिले. घरोघरी तपासणी आणि देखरेखीवर लक्ष केंद्रित केले जावे, असेही सांगितले. आशा व अंगणवाडी सेविकांना सर्व आवश्यक वस्तू पुरवा. तसेच ग्रामीण भागात होम क्वारंटाईनचा पर्याय सुचविण्याबरोबरच उपचारांसाठी सोप्या भाषेत चित्रांसह मार्गदर्शक सूचना देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वितरण आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली.

व्हेंटिलेटर्सचे ऑडिट करण्याचा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरबाबतचे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा उपयोग केला जात नसल्याने पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले. गरज पडल्यास आरोग्य कर्मचाऱयांना व्हेंटिलेटर वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

आंतरराष्ट्रीय हवाई सेवा 15 जुलैपर्यंत राहणार बंदच

Patil_p

दोन खलिस्तानवाद्यांची संपत्ती होणार जप्त

Patil_p

हिंदूंनी स्वार्थापोटी धर्म बदलू नये

Patil_p

दिलासादायक : उत्तराखंडात सात जिल्ह्यात आढळला नाही एकही रुग्ण

Rohan_P

चिंताजनक : देशात २४ तासांत ६९ हजार कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

देशात तुटवडा; अन् भाजप कार्यालयात 5 हजार ‘रेमडेसिवीर’चा साठा

datta jadhav
error: Content is protected !!