तरुण भारत

ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन

कोलकाता / वृत्तसंस्था

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कनिष्ठ बंधू अशीम बॅनर्जी यांचे येथे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. येथील एका खासगी कोरोना उपचार केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. तथापि, उपचारांचा उपयोग न होता, त्यांचे शनिवारी निधन झाले. ते कालीघाट येथे वास्तव्यास होते. त्यांना त्यांच्या परिसरात कालीदा म्हणून ओळखण्यात येत होते. एक महिन्यापूर्वीच त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून ते याच रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कोरोनामुळे होणारे फुप्फुसाचे विकार झाले होते, असे सांगण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यासंबंधी ममता बॅनर्जी यांना शोकसंदेश पाठवून त्यांचे सांत्वन केले आहे

Advertisements

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात ३७ कोरोनामुक्त तर १३ नवे रुग्ण

triratna

कर्नाटकः आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करीत फेसबुकवर फसवणुकीचा प्रयत्न

triratna

कोरोना फैलावामुळे ‘ऑनलाईन’च्या कक्षा रुंदावणार

Patil_p

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

Shankar_P

यमगेतील पाण्याचे 24 पैकी 23 नमुने दूषित: गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 467

triratna

जाण्या येण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदणी करा

triratna
error: Content is protected !!