तरुण भारत

विंडीजचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम जाहीर

वृत्तसंस्था/ बार्बाडोस

विंडीज क्रिकेट संघाचा 2021 क्रिकेट हंगामातील भरगच्च कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कालावधीत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे संघ विंडीजचा दौरा करणार आहेत.

Advertisements

येत्या जून ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघांचे विंडीजमध्ये पाठोपाठ मालिका खेळविल्या जाणार आहेत. येत्या जूनमध्ये विंडीजच्या उन्हाळी क्रिकेट हंगामाला दक्षिण आफ्रिकाविरूद्ध कसोटी आणि टी-20 मालिकेने प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची ही मालिका सुरूवातीला 2020 साली आयोजित केली होती. पण ती लांबणीवर टाकावी लागली.

विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 10 जूनपासून सेंट लुसिया येथे प्रारंभ होणार आहे. यानंतर विंडीज-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका ग्रेनेडा येथे खेळविली जाणार असून ही मालिका 3 जुलैला संपणार आहे. 2010 नंतर प्रथमच या उभय संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत आहे.

9 ते 24 जुलै दरम्यान विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि त्यानंतर क्रिकेट विश्वचषक सुपर लीग स्पर्धेतील तीन वनडे सामने होणार आहेत. विंडीज संघाने अलिकडेच श्रीलंकेचा वनडे मालिकेत 3-0 असा पराभव केला असल्याने आता त्याचे लक्ष 2023 आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत थेट प्रवेशावर राहील.

ऑस्ट्रेलियाची मालिका संपल्यानंतर पाकचा संघ विंडीजच्या दौऱयावर जाणार आहे. विंडीज-पाक यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार असून या मालिकेतील सामने बार्बाडोस आणि गयाना येथे खेळविले जातील. या मालिकेनंतर उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका जमैकामध्ये होणार आहे. पाकचा विंडीज दौरा 26 जून ते 24 ऑगस्ट दरम्यान राहील.

 कॅरेबियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चार दिवस अगोदर पाकचा विंडीज दौरा संपणार आहे. विंडीजचा संघ 2021 क्रिकेट हंगामात एकूण 15 टी-20 सामने, 4 कसोटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. चालू वर्षांच्या प्रारंभी विंडीजने लंकेविरूद्धच्या सर्व मालिका यशस्वीपणे भरविल्या होत्या. आता क्रिकेट विंडीज दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाक संघाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. विंडीज संघाच्या या भरगच्च कार्यक्रमामुळे क्रिकेट शौकिनांना खेळाचा आणखी आनंद लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Related Stories

ब्रुनो फर्नांडिस चौथ्यांदा महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

पीसीबीच्या हॉल ऑफ फेमचे उद्घाटन लवकरच

Patil_p

जेमिमा रॉड्रिग्यूज द हंड्रेड स्पर्धेत खेळणार

Patil_p

पदक निश्चित! रवीकुमार दहियाचा अंतिम फेरीत प्रवेश

datta jadhav

WTC Final : न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 ची घोषणा

Abhijeet Shinde

स्पर्धेतून रैनाची माघार, आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!