तरुण भारत

निवड समिती सदस्यांसाठी सुरिंदर अमरनाथचा अर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समिती सदस्यासाठी भारताचा माजी फलंदाज सुरिंदर अमरनाथने अर्ज पाठविला आहे. कनिष्ठ क्रिकेट निवड समितीच्या पाच सदस्यांसाठी गेल्या महिन्यात इच्छुकांकडून बीसीसीआयने अर्ज मागविले होते.

Advertisements

भारताचे माजी क्रिकेटपटू दिवंगत लाला अमरनाथ यांचा सुरिंदर अमरनाथ चिरंजीव आहे. सुरिंदर अमरनाथने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 10 कसोटी आणि 3 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले असून त्याने 145 प्रथमश्रेणी सामन्यात 8000 पेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. 72 वर्षीय सुरिंदर अमरनाथला क्रिकेटमधील मोठा अनुभव असल्याने बीसीसीआयकडून त्याला निवड सदस्यांची संधी कदाचित मिळू शकेल. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सुरिंदर अमरनाथने क्रिकेट प्रशिक्षक म्हणून मोरोक्कोत तीन वर्षांचा कालावधी घालविला होता. काही दिवस ते गोवा क्रिकेट संघटनेचे क्रिकेट सल्लागार होते.

सुरिंदर अमरनाथनने 1974 साली ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकविले होते. तसेच या सामन्यात सुनील गावसकर यांच्यासमवेत 204 धावांची भागीदारी केली होती. मोहिंदर अमरनाथचे ते बंधू आहेत.

Related Stories

मुंबई इंडियन्सची पुन्हा अव्वलस्थानी झेप

Patil_p

सामना वाचवण्याचे भारतासमोर आव्हान

Patil_p

दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडचा डावाने विजय

Patil_p

मुष्टीयुद्ध फेडरेशनची निवडणूक 18 डिसेंबरला

Patil_p

ऐच्छिक नेमबाजी शिबीर लांबणीवर

Patil_p

सित्सिपस, गॅरीन उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!