तरुण भारत

डब्ल्यूव्ही रमण यांची बीसीसीआयकडे तक्रार

सौरभ गांगुली, राहुल द्रविड यांना लक्ष घालण्याची विनंती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

माझी प्रतिमा कलंकित करण्यासाठी माझ्याविरोधात काही जणांचे कटकारस्थान सुरु होते. याची तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी विनंती भारतीय महिला संघाचे पदच्युत प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांना केली आहे. रमण यांनी गांगुलींना एका मेलद्वारे ही विनंती केली असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल दविड यांनाही त्याची प्रत पाठवली आहे.

क्रिकेट सल्लागार समितीने दोनच दिवसांपूर्वी आश्चर्यकारकरित्या डब्ल्यूव्ही रमण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करत त्यांच्याऐवजी रमेश पोवार यांची वर्णी लावली होती. त्यावरुन भारतीय महिला क्रिकेट वर्तुळात बरीच खळबळ उडाली आहे. रमण यांच्या मार्गदर्शनाखालीच भारतीय महिला संघाने गतवर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपजेतेपद काबीज केले होते.

‘माझ्याविरुद्ध मोहीम सुरु होती, हे अनकेदा जाणवले. पण, मी माझ्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य होते. बीसीसीआयला आवश्यकता भासत असेल तर मी माझी बाजू मांडण्यासाठी हजर राहू शकतो’, असे रमण यांनी आपल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.  

शफाली, शिखाचा समावेश, इंद्राणीला पदार्पणाची संधी

नवी दिल्ली ः झारखंची युवा यष्टीरक्षक इंद्राणी रॉय हिला आगामी इंग्लंड दौऱयासाठी भारतीय महिला संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. शफाली वर्मा व शिखा पांडे यांचेही संघात पुनरागमन झाले. मात्र, वरिष्ठ डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड हिला संघातून वगळले गेले आहे. नीतू डेव्हिड यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने निवडीत करेक्शन करत शफाली व शिखा यांना तिन्ही संघात स्थान दिले आहे. मागील वर्षी वादग्रस्त निवडीमुळे चर्चेत आलेल्या मोनिका पटेल व सी. प्रत्युषा यांना आता संघातून वगळले गेले आहे.

भारत-इंग्लंड महिला संघात 1 कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून कसोटी व वनडे संघाचे नेतृत्व मिताली राजकडे तर टी-20 संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे असणार आहे.

कसोटी व वनडे संघ ः मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्यूज, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.

टी-20 संघ ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्यूज, शफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक-फलंदाज), इंदाणी रॉय (यष्टीरक्षक) शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहादूर.

Related Stories

पाकमधील सामन्यासाठी पंचांची नियुक्ती

Patil_p

नवे सचिव भरत सिंग चौहान यांचा सत्कार

Patil_p

आयपीएल रुपरेषेची आज घोषणा : गांगुली

Patil_p

अरुण भारद्वाजची कौतुकास्पद कामगिरी

Patil_p

एसएस प्रणॉयची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Patil_p

स्पेनच्या हॅलेपचे लक्ष दुसऱया जेतेपदावर

Patil_p
error: Content is protected !!