तरुण भारत

स्वीडनचा इब्राहिमोव्हिक युरो स्पर्धेतून बाहेर

मिलान / वृत्तसंस्था

झॅल्टन इब्राहिमोव्हिक हा दिग्गज खेळाडू आगामी युरो चॅम्पियनशिप स्पर्धेत गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, असे स्विडीश सॉकर फेडरेशनने शनिवारी जाहीर केले. मागील आठवडय़ात एसी मिलानने युवेन्टसला 3-1 अशा फरकाने नमवले, त्यावेळी इब्राहिमोव्हिकला सदर दुखापत झाली होती. शनिवारी या दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले. तूर्तास, त्याला डॉक्टरांनी 6 आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 39 वर्षीय इब्राहिमोव्हिकने आपण वेळेत दुखापतीतून सावरु शकत नसल्याचे यावेळी फेडरेशनला सांगितले.

Advertisements

इब्राहिमोव्हिकने मार्चमध्ये आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेतली असून तब्बल 5 वर्षांपूर्वी त्याने आपल्या देशातर्फे शेवटचा सामना खेळला होता. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार युरो स्पर्धा 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. पण, कोरोनामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकली गेली. यंदा ही स्पर्धा दि. 11 जूनपासून खेळवली जाणार असून स्वीडनचा पहिला सामना दि. 14 जून रोजी स्पेनविरुद्ध होणार आहे. ई गटात स्वीडनच्या लढती पोलंड व स्लोव्हाकिया यांच्याविरुद्धही होतील.

Related Stories

आयर्लंड संघाच्या उपकर्णधारपदी पॉल स्टर्लिंग

Patil_p

केएल राहुलचा आरसीबीला शतकी तडाखा

Omkar B

हॅलेप प्राग स्पर्धेत खेळणार

Patil_p

चिलीचा सांचेझ जखमी

Patil_p

लीसेस्टर सिटीकडे पहिल्यांदाच एफए चषक

Patil_p

साक्षी म्हणते, अफवांवर विश्वास ठेवू नका!

Patil_p
error: Content is protected !!