तरुण भारत

जिल्हय़ात मेघगर्जनेसह पाऊस

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हय़ात शनिवारी सर्वत्र मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्य़ा  उकाडय़ाने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांसह जिल्हय़ातील नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाल़ा  ताऊक्ते चक्रीवादळ येणार असल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होत़ी शनिवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस कोसळला होता. या पावसाने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले. दरम्यान रविवारी पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आह़े  

Advertisements

रत्नागिरीत मागील 2 दिवसांपासून वातावरणात मळभ दिसून येत होत़ी तसेच ढगांचा गडगडाटही होत होत़ा  तर शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत होत़े त्यामुळे जोरादार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होत़ी  मात्र प्रत्यक्षात पावसाने केवळ दर्शनच दिल़े 15 ते 20 मिनिटेच पाऊस कोसळल़ा यामुळे काहीसा गारवा निर्माण झाला होत़ा त्यामुळे मागील महिनाभरापासून उकाडय़ाने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा मिळाल़ा शनिवारी रत्नागिरीत तालुक्यातही ग्रामीण भागामध्ये पावसाने हजेरी लावली. अद्याप शेतीपूर्वीची कामे सुरू असल्याने या पावसाने शेतकाऱयांची चांगलीच धावपळ उडाली. तर शहरी भागात देखील पावसामुळे रस्त्यांचे नवे संकट उभे राहिले आह़े नवीन नळपाणी योजनेमुळे रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आह़े खोदकाम केलेली माती रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. ताऊक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार पावसाचा इशारा दिला आह़े त्यासाठी प्रशासनालाही हायअलर्ट करण्यात आले आह़े रविवारी पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आह़े 

                   राजापुरात पावसाचा शिडकावा       

राजापूरः तालुक्यातील अनेक भागात शनिवारी दुपारी 3च्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण व उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलास मिळाला आहे. चक्रीवादळ व जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. अशातच शनिवारी सांयकाळी 3 च्या सुमारास विजा चमकू लागल्या व कडकडाटही होऊ लागला. त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरूवात झाली. तर पश्चिम भागात हलक्या सरी तर पूर्व भागात काही ठिकाणी दमदार पाऊस झाला.

संगमेश्वर तालुक्यात तुरळक सरी

संगमेश्वरः तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. हवामान खात्याने वादळाचा इशारा दिल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाल्या असून महसूल विभागाकडून सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे

                                      खेडमध्ये पाऊस

खेडः हवामान खात्याने ताऊक्ते चक्रीवादळ शनिवारी व रविवारी कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावलेली असतानाच शनिवारीही पावसाने सायंकाळी 5.15 च्या सुमारास पुन्हा हजेरी लावली. दुपारपासूनच निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने पाऊस पडण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. पावसामुळे वातावरणातील उष्मा नाहीसा होवून गारव्यामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला. मागील काही दिवसांमध्ये अधूनमधून पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत अडकला आहे. विक्रीसाठी काढलेला आंबा लॉकडाऊनमुळे विकला जात नाही. त्यात पावसाच्या आगमनामुळे आंब्याला दर मिळेल की नाही, याची चिंता वाटू लागली आहे.

  लांजा तालुक्यात तासभर पाऊस

लांजाः तालुक्यात शनिवारी दुपारी जोरदार वादळी वाऱयासह पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वादळाचा इशारा दिल्याने तालुक्यातील नागरिक भीतीखाली होते. पाऊस पडल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. शनिवारी दुपारी 3.30च्या दरम्यान पावसाने सुरुवात केली. सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत तासभर पाऊस पडला. पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.                                       गणपतीपुळेत समुद्र फेसाळला गणपतीपुळेः रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड -गणपतीपुळे परिसरात दुपारी 3च्या सुमारास पावसाने धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सध्या पर्यटक नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे, मात्र येथील अथांग पसरलेला समुद्र वादळसदृश परिस्थिती असल्यामुळे खवळला आहे. त्यामुळे मोठय़ा लाटा उसळतीळ, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी वादळाच्या स्थितीत समुद्राचे पाणी मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊन धडकत होते. तसेच समुद्रकिनाऱयावर सध्या वादळाचे सावट असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे, मात्र शनिवारी कुठलाही धोका उद्भवलेला नाही

Related Stories

माडबन समुद्र किनारी आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची 88 अंडी

Patil_p

रत्नागिरी : प्रेक्षकाविना चित्रपटगृहे ओस

triratna

रत्नागिरी : खेडला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळता मिळेना !

Shankar_P

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य

NIKHIL_N

जिल्हय़ात 141 रुग्णांची वाढ – तिघांचा मृत्यू, 73 जण कोरोनामुक्त

Patil_p

‘क्वारंटाईन’प्रश्नी प्रशासनाची बेपर्वाई

NIKHIL_N
error: Content is protected !!