तरुण भारत

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी प्रवेशाची आज शताब्दी!

रत्नागिरी

अंदमानच्या कारागृहात दुहेरी जन्मठेप भोगणाऱया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रत्नागिरी प्रवेशाला आज 16 मे 2021 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वा. सावरकर यांच्या रत्नागिरी प्रवेशाच्या शताब्दी दिनाच्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

Advertisements

  बरोबर 100 वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये इतिहास घडल़ा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना संपूर्ण देशातल्या लोकांच्या प्रक्षोभामुळे व लंडनमधील निर्णयामुळे तुरुंगातून मुक्त करा, असा आदेश ब्रिटीश सरकारने दिल़ा 50 वर्षाची शिक्षा भोगायची असताना सावरकर यांनी मृत्यूवर मात करुन अंदमान कारागृहाचा दरवाजा सुटकेसाठी उघडायला लावल़ा  2 मे 1921 ला अंदमानच्या कारागृहातून दोन्ही सावरकर बंधुंना मुक्त करुन बोटीने कलकत्त्यामधील अलिपूरच्या कारागृहात आणण्यात आल़े तेथून रेल्वेने मुंबईमध्ये आणून सावरकरांची रवानगी डोंगरीच्या किल्ल्यात करण्यात आल़ी सावरकरांना मुंबईत ठेवण्यापेक्षा रत्नागिरी विशेष कारागृहात ठेवण्याच्या दृष्टीने 16 मे 1921 रोजी सकाळी बोटीने सावरकर यांना रत्नागिरीमध्ये आणण्यात आल़े सकाळी मुंबईतून निघालेली बोट रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीमध्ये दाखल झाल़ी अत्यंत गुप्तपणे सावरकर यांना बोटीतून उतरवून रत्नागिरीच्या विशेष कारागृहामध्ये ठेवण्यात आल़े याच 16 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पहिले पाऊल रत्नागिरीमध्ये उमटल़े इतिहास सांगतो की, हे पहिले पाऊल पुढील 16 वर्षासाठी रत्नागिरीचा भाग्योदय करण्यासाठीच होत़े

  सावरकर कारागृहामध्ये आले तेव्हा त्यांचा रत्नागिरीतील नागरिकांशी संपर्क नव्हत़ा  मात्र मुंबईतील त्यांच्या सहकाऱयांनी रत्नागिरीतील नागरिकांशी संपर्क साधून सावरकर यांना कारागृहात ठेवण्यात आले असून त्यांना मदत हवी असल्यास व्यवस्था करावी, असे सूचवल़े सावरकर जवळपास 3 वर्ष कारागृहात होत़े  नंतर त्यांची रवानगी पुण्यातल्या कारागृहात करण्यात आल़ी पुण्यातून 6 जानेवारी 1924 रोजी त्यांना मुक्त करण्यात आले व पुन्हा रत्नागिरीमध्ये राजकीय बंदी म्हणून आणण्यात आल़े 

  रत्नागिरी कारागृहातील 3 वर्षामध्ये रत्नागिरीतील एकमेव व्यक्ती संपर्कामध्ये होती. ती म्हणजे वैद्य म़ ग़ शिंदे. कारागृहात असताना सावरकर यांनी हिंदुत्व गंथांचे लेखन केले व ते लिखित साहित्य वैद्य म़ ग़ शिंदे यांच्यामार्फत कारागृहाबाहेर येत अस़े यथावकाश सावरकर शिरगाव येथे रहायला गेल्यावर तेथे या ग्रंथाचे संपादन करण्यात आल़े तसेच अंदमानातील कारागृहात असताना सावरकरांनी कारागृहाच्या भिंतीवर एक महाकाव्य लिहिल़े ते एका कैद्यामार्फत पाठ करुन पुण्यात आले व तेथून ते रत्नागिरीत आल़े  रत्नागिरीमध्ये या महाकाव्याचे संपादन करुन रत्नागिरीच्या कारागृहात हे महाकाव्य ‘कमलाकाव्य’ म्हणून प्रकाशन स्वतःच्या नावे न करता सावरकर यांनी ‘विजनवासी’ या नावाने केल़े

रत्नागिरीत क्रांतीचे वादळ उठवले

100 वर्षीपूर्वी आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये प्रवेश केल़ा आणि संपूर्ण रत्नागिरीमध्ये भारतातील सामाजिक क्रांतीचे वादळ उठवल़े क्रांती घडवल़ी त्यांच्या प्रवेशाची शताब्दीसुध्दा निसर्गान एक वादळ समुदामधून आणून साजरी केलेली दिसते.

Related Stories

रत्नागिरीत प्रतिदिन नमुना तपासणी 249 पर्यंत, आज 98 पॉझिटिव्ह

Shankar_P

घाटमाथ्यावरून जीवनावश्यक वस्तू आणण्यावर बंदी

Patil_p

532 रुग्णांनी केली कोरोनावर मात

NIKHIL_N

वृद्धेची होऊनही परवड, प्रशासन मात्र गिरवतेय ‘अबकड’

NIKHIL_N

चिपळुणातील महामार्ग उड्डाण पूल कामास प्रारंभ

Patil_p

तेरवण येथील शाळकरी मुलाची कॅन्सरशी झुंज

NIKHIL_N
error: Content is protected !!