तरुण भारत

म. ए.समितीच्या आयसोलेशन सेंटरमधून पहिले दाम्पत्य कोरोनामुक्त

आपुलकीच्या सेवेबद्दल मानले आभार

बेळगाव  / प्रतिनिधी

Advertisements

महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसहभागातून सुरू केलेले कोविड आयसोलेशन सेंटरमधून पहिले दाम्पत्य शनिवारी कोरोनामुक्त झाले. आयसोलेशन सेंटरमध्ये मिळालेली उत्तम सेवा, करण्यात आलेला औषधोपचार यामुळे हे दाम्पत्य भावनाविवश झाले. यापुढेही रुग्णांना अशीच आपुलकीची सेवा द्या, असा आशिर्वाद त्या दाम्पत्याने दिला.

कोरोना झाल्यामुळे शामराव व आशा देसाई यांना म. ए. समितीच्या मराठा मंदिर येथील आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काही दिवस उपचार करण्यात आले. उत्तम सेवा मिळाल्याने हे दोघेही अवघ्या पाच दिवसांमध्ये कोरोनामुक्त होवून बाहेर पडले. शनिवारी सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

 शामराव देसाई म्हणाले, कोरोना झाल्यामुळे घाबरलो होतो. परंतु म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरमध्ये आल्यानंतर ही भीती कमी झाली. येथील नर्स तसेच डॉक्टर यांनी खूप चांगली सेवा दिली. वेळेवर नाष्टा, जेवण, चहा यांची व्यवस्था केल्यामुळेच आम्ही लवकर बरे होवू शकलो. त्यामुळे मी म. ए. समितीचे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, अंकुश केसरकर, बाळू जोशी, सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, राजू कदम, अनिल सांबरेकर, इंद्रजित धामणेकर यांच्या इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

निर्बंधित प्रदेशातील काही निर्बंध हटविले

Patil_p

आर्ट्स सर्कलची वार्षिक सर्वसाधारण सभा लांबणीवर

Omkar B

विषारी बिया खाल्याने चार मुली अत्यवस्थ

Patil_p

कोरोना बळींची मालिका सुरूच

Rohan_P

पार्वतीनगर येथे तिघा मटकाबुकींना अटक

Omkar B

हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करणार

Patil_p
error: Content is protected !!